विधान परिषद निवडणूकित महाविकास आघाडी तर महायुतीत अजूनही बेबनाव
Maha Vikas Aghadi in Vidhan Sabha Elections and still nameless in Maha Union
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीत उमेदवारीवरुन माहाविकास आघाडीत वाद सुरु होता. अखरे कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटला आहे.
शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
काँग्रेसचे रमेश किर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत कोकण भवन मध्ये दोन्ही उमेदवारांना सोबत घेऊन आले.
तर, मुंबई शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला मागे. इंडिया आघाडीचा धर्म पाळत आज आम्ही माघार घेतली .
जे इंडिया आघाडीचे उमेदवर असतील त्यांचा प्रचार करणार, यावेळी देखील 100टक्के यश मिळणार असे सांगितले.
शिक्षक, पदवीधर निवडणूक
मुंबई शिक्षक
महायुती – शिवाजीराव नलावडे (AP), शिवाजी शेंडगे (शिंदे), शिवनाथ दराडे (भाजप)
मविआ – ज. मो. अभ्यंकर
मुंबई पदवीधर
महायुती – दीपक सावंत (शिंदे), किरण शेलार (भाजप)
मविआ – अनिल परब (ठाकरे)
कोकण पदवीधर
महायुती – निरंजन डावखरे, भाजप
मविआ – रमेश कीर (काँग्रेस)
नाशिक शिक्षक
महायुती – किशोर दराडे (शिंदे), महेद्र भावसार (AP), राजेंद्र विखे (BJP), विवेक कोल्हे (BJP)
मविआ – संदीप गुळवे (ठाकरे)