किम जोंग उनने असे काही केले की,शत्रू राष्ट्रांमध्ये पसरले भितीचं सावट

Kim Jong Un did something that spread fear among enemy nations

 

 

 

 

‘‘लष्करी हेरगिरी उपग्रह अवकाशात सोडणे हा स्वरक्षणाचा अधिकार आहे,’’ असे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी आज ठामपणे सांगितले. उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी ‘मॅलिंगयाँग-१’ हा पहिला हेरगिरी उपग्रह अवकाशात सोडला.

 

 

 

देशाच्या ‘अवकाश शक्तीचे नवे युग’ सुरू झाल्याचा आनंद किम जोंग उन यांनी साजरा केल्याचे ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ (केसीएनए) या कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले.

 

 

या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर काही तासांतच किम जोंग यांनी अमेरिकेच्या गुआम येथील सैन्यतळाच्या प्रतिमांचे निरीक्षण केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

 

 

‘‘शत्रू देशांच्या धोकादायक आणि आक्रमक हालचालींपासून उत्तर कोरियाचे संरक्षण करण्यासाठी हेरगिरी उपग्रहाची मदत होईल.

 

 

हे प्रक्षेपण म्हणजे सर्वांसाठी एक इशारा आहे,’’ असे किम जोंग उन म्हणाले. प्रक्षेपणामुळे दक्षिण कोरियासह संपूर्ण द्विपकल्पातील तणावात भर पडली आहे.

 

 

किम यांनी ‘नॅशनल एरोस्पेस टेक्नॉलॉजी ॲडमिनिस्ट्रेशन’ (नाटा)ला भेट देऊन शास्त्रज्ञ आणि अंतराळ मोहिमेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

 

यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी व अन्य कुटुंबीयही होते. ‘नाटा’चे बोधचिन्ह असलेले टी शर्ट कार्यक्रमाला उपस्थितांनी परिधान केले होते.

 

 

या महत्त्वाकांक्षी प्रक्षेपणामागील प्रेरणाशक्ती असलेले किम जोंग यांचे आभार शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी मानले. किन जोंग यांनीही त्यांच्याप्रती वडिलकीच्या नात्याने प्रेमभाव दाखविला, असे ‘केसीएनए’ने म्हटले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *