लाडकी बहिण योजनेचे फॉर्म बाबत मोठी अपडेट

Big update regarding Ladki Bahin Yojana form

 

 

 

 

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनादरम्यान, महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेचे घोषणा केली.

 

 

 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार असल्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे.

 

 

 

 

या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

 

 

 

लाडकी बहिण योजनेत आता अॅपसोबत ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरता येणार आहे. याशिवाय ऑफलाईन सुविधाही सुरु आहे. इतर कुठल्याही योजनांवर नकारात्मक पडसाद या योजनेवर उमटणार नाहीत,

 

 

 

 

असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. “माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे. काल त्यात काही बदल करण्यात आले आहेत.

 

 

 

21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, त्यांना 1500 रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

 

 

 

31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

 

 

 

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा,

 

 

 

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *