काँग्रेस नेत्याने दिला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा फार्मुला

The Congress leader gave the formula to give reservation to Maratha community from OBC

 

 

 

ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार असून सरकारने माझा फॉर्म्यूला स्वीकारला तर

 

 

२४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिर्डीत व्यक्त केला.

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आणि आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची गरज असून मराठा – ओबीसी मोर्चांमुळे गावागावातील परिस्थिती भयानक झाली आहे.

 

 

 

ओबीसी आरक्षणाची योग्य वाटणी केली तर २४ डिसेंबरच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिर्डीत व्यक्त केलाय.

 

 

 

मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने आल्यासारखी टीका सुरू आहे.भावा-भावा प्रमाणे राहणारे लोक असे वागले तर कसे होईल?

 

 

आगामी काळात जाळपोळ, दंगल काहीही होऊ शकते. बीडमध्ये झाले ते योग्य नव्हते. उद्या तुम्हा आम्हासोबत असे होऊ शकते असंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.

 

 

हिंगोली येथे ओबीसी समाजाची सभा होणार आहे. यासाठी एकीकडे सभेचे निमंत्रण दिले जातेय तर दुसरीकडे जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली जात आहे.

 

 

विचार मांडणे ही आमची चूक आहे का? आणी मला शिव्या दिल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल हरीभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांना केलाय.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *