तेजस’ काँग्रेसच्या काळातच पूर्ण; जयराम रमेश यांची पंतप्रधानांवर टीका

Tejas' completed only during Congress; Jairam Ramesh's criticism of the Prime Minister

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानातून अवकाशात उड्डाण केलं आहे. त्यानंतर त्याचे फोटोही शेअर करत देशवासियांचे आभार मानले.

 

 

पण मोदींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेल्या तेजसच्या डिझाईनला काँग्रेसच्या काळातच मान्यता देण्यात आल्याचं सांगत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली.

 

 

 

तेजसचे डिझाईन करणारी संस्था एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने ही 1984 साली स्थापन करण्यात आली होती, त्यामुळे या आधीच्या सरकारने केलेल्या कार्याची दखल मोदींनी घ्यायला काही हरकत नव्हती अशी खोचक टीका जयराम रमेश यांनी केली.

 

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलंय की, तेजस हे आमच्या स्वदेशी वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतेचं यश आहे. 1984 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने (ADA) तेजसची रचना केली होती. या हलक्या लढाऊ विमानाचे डिझाईन 6 वर्षानंतर अंतिम करण्यात आले.

 

 

 

जयराम रमेश यांनी सांगितलं की, तेजसची रचना ADA ने केल्यानंतर, त्यावर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL), भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाच्या सहकार्याने काम करण्यात आले.

 

 

जयराम रमेश म्हणाले की, तेजस या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानाच्या डिझाइनला सहा वर्षांनंतर अंतिम रूप देण्यात आले. अखेर 2011 मध्ये त्याला कार्यान्वित मान्यता देण्यात आली. अर्थात असे आणखी अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. अनेक दशकांपूर्वी ही योजना मोठ्या निर्धाराने तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘इलेक्शन फोटो-ऑप्स’च्या मास्टरला 2014 पूर्वीच्या प्रयत्नांना दाद देण्यास काही हरकत नाही. मोदी जे आता श्रेय घेतात ते काँग्रेसच्या काळातच पूर्ण झालं आहे.

 

 

 

दरम्यान, शनिवारी (25 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) केंद्रावरून तेजस या हलक्या लढाऊ विमानातून अवकाशात उड्डाण केले. त्यानंतर त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. HAL द्वारे निर्मित तेजस फायटर जेट हे प्रामुख्याने भारतीय वायुसेनेच्या मिग 21 लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी विकसित केले गेले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *