क्रेनच्या ट्रॉलीमधून शरद पवार गटातील नेते थोडक्यात बचावले;पाहा VIDEO
Leaders of Sharad Pawar's group narrowly escaped from the crane's trolley

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात जनसन्मान यात्रेला सुरूवात केली आहे.
तर महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाकडूनही आज शुक्रवारी शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आलीय. या यात्रेची सुरूवात
जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आली. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे नेते अपघातामधून बचावले.
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहाप अर्पण केला जात होता.
यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या क्रेनमध्ये होत्या.
क्रेन खाली येत असताना छोटासा अपघात झाला, क्रेनच्या ट्रॉलीमध्ये सगळे उभे होते अन् अचानक ट्रॉलीमध्ये बिघाड झाला आणि एका बाजूला काहीशी कलंडली गेली.
ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख आणि रोहिणी खडसे या सर्वांना ट्रॉलीला घट्ट पकडलं. त्यानंतर हळूहळू ट्रॉफी खाली आल्यावर सर्व नेते सुरक्षितपणे खाली उरतले.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हेच्या हाताला दुखापत झाली.
जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले पण मंचरच्या सभेपुर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं आणि डॉक्टरांकडून उपचार घेतले.
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे नेते अपघातामधून बचावले. नेमकं काय घडलं, पाहा Video pic.twitter.com/e2xrnxEBJQ
— Harish Malusare (@harish_malusare) August 9, 2024