शेतकरी अनुदानावरून जरांगे पाटील यांनी सरकारला दिला इशारा
Jarange Patil warned the government about farmers subsidy

मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी मध्यरात्री शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.
या चर्चेनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. शेतकरी नुकसान आणि आरक्षणावर चर्चा झाल्याचं यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील
यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.
शेतकरी नुकसान आणि आरक्षणावर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे नुकसान पाहून आज रात्री मला झोप येणार नाही. इथे राजकारण करू नका, सरसकट नुकसान भरपाई दहा दिवसांत द्या.
एकमेकांवर राजकीय आरोप करून शेतकऱ्यांच्या दुःखा कडे दुर्लक्ष केले तर शेतकरी त्या दोघांकडे दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान अब्दुल सत्तार यांनी देखील यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानावर प्रतिक्रिया दिली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले आहे.
मी सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले, नुकसान झालेले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मनोज जरांगे पाटील
यांची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट बैठकीत मांडणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.