महाराष्ट्रात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोदींची सभा

Modi's meeting in Congress stronghold in Maharashtra

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आणि विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

 

नागपूरमार्गे ते वर्धेला जातील. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किट आणि धनादेशाचे वितरण केले जाणार आहे.

 

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते सक्रिय झाले असून त्यांचे नागपूर मार्गे आवागमन होणार असल्याने जिल्हा प्रशासन व सुरक्षा यंत्रणाही सज्ज होत आहे.

 

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी केंद्राने वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट

 

व पक्षाचे नेते सुमित वानखेडेदेखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येत्या सोमवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

 

मागील वीस दिवसात दोन पीएम मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ३० ऑगस्ट शुक्रवारी रोजी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर मोदी आले होते.

 

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला मोदींनी भेट दिली.

 

त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरला रवाना झाले, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले.

 

याशिवाय मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही पार पडले. सुमारे १५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.

 

या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे विमानतळ परिसरात रविवारी २५ ऑगस्ट रोजी ‘लखपती दीदी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींनी आधीच्या सरकारची ७० वर्षांतील कामांचा पाढा वाचून दाखवला.

 

काय म्हणाले मोदी, माझ्या सरकारच्या काळातील कामे पाहा, आमच्याइतकी महिला सक्षमीकरणाची कामे कुणी केली नाहीत,’ असा दावाही मोदी यांनी केला.

 

एक कोटी महिला लखपती ‘तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते. त्यानुसार एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत.

 

मागील दोन महिन्यांत ११ लाख लखपती दीदी झाल्या आहेत,’ असे सांगून मोदी यांनी आम्ही २० लाखांपर्यंत मुद्रा कर्ज देणार आहोत, असेही जाहीर केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *