महायुतीमधील उमेदवारी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला
The time was decided to announce the candidature in the grand coalition
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आता आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपची चर्चा सुरु आहे.
भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्षांसह महायुतीमधील छोट्या पक्षांनाही स्थान देण्यात येणार आहे.
महायुतीमधील पक्षांनी जिंकलेल्या जागा अपवाद वगळता त्यांच्याकडे ठेवण्यात येणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांची उमेदवार यादीसुद्धा
एकत्रित जाहीर करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी असणार आहे. या यादीत तिन्ही पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्या जागांवर वाद आहेत,
त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु लोकसभेसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून महायुतीने विधानसभेत जोरदार तयारी केली आहे.
अनेक जागांवर उमेदवारांची नावेसुद्धा निश्चित झाली आहेत. लोकसभेत उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे काही जागांवर महायुतीच्या
उमेदवारांचा पराभव झाला. ऐनवेळेस उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचारास वेळ मिळाला नाही. तोपर्यंत विरोधी उमेदवाराचे प्रचाराचे दोन, तीन टप्पे पूर्ण झाले होते.
दिल्लीत पुन्हा एकदा भाजप नेते अन् गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केमिस्ट्री जुळून आली. दिल्लीत नक्षलीग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होती.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची अमित शहा यांच्या खुर्चीजवळ होती. अमित शाह यांच्या एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तर एका बाजूला जेपी नड्डा यांची खुर्ची होती. यापूर्वीही अनेक वेळा शाह आणि शिंदे यांची केमिस्ट्री राजकीय वर्तुळात चर्चेची ठरलेली होती. नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर फोटोसेशन करण्यात आले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची बैठक झाली.
राजधानी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यावर जागा वाटपावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.