महाविकास आघाडीतील पवार, ठाकरे आणि काँग्रेसचा कोणत्या भागात सुपडा साफ
In which areas will Pawar, Thackeray and Congress in the Mahavikas Aghadi win?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल अखे समोर आला आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे.
त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे.
त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. पण महायुतीला त्यापेक्षाही जास्त 95 जागांवर विजय मिळाला आहे.
त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार
यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे.
पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही. महाराष्ट्रात विभागनिहाय विचार केला तर
काही प्रांतामध्ये शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
विदर्भात एकूण 62 जागा आहेत. यापैकी भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. भाजपला विदर्भात एकूण 38 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळालं आहे.
तसेच शिवसेना शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसला 9 तर ठाकरे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंदेखील उघडता आलेलं नाही.
खान्देश म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 जागांपैकी भाजपला 20 जागांवर यश मिळालं आहे. शिवसेनेला 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागांवर यश मिळणार आहे.
तर महाविकास आघाडीत काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. तर ठाकरे गटाला खातंदेखील उघडता आलं नाही. तसेच शरद पवार गटाला देखील केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
कोकणात विधानसभेच्या 39 जागांपैकी 2 जागा सोडल्या तर सर्व जागांवर महायुतीला यश आलं आहे. भाजपला 16, शिवसेनेला 16 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवर यश आलं आहे.
तर कोकणात काँग्रेसचा एकही उमेदवार आलेला नाही. तसेच ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एका जागेवर कोकणात यश मिळालेलं बघायला मिळत आहे.
मुंबईतही महायुती सरस ठरली आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. यापैकी तब्बल 15 जागांवर भाजपला यश आलं आहे. तर शिवसेनेला 6 आणि अजित पवार गटाला 1 जागेवर यश मिळालं आहे.
अजित पवार गटाला अणुशक्तीनगरच्या जागेवर यश मिळालं आहे. दुसरीकडे मुंबईत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला चांगलं यश मिळालेलं आहे.
मुंबईत ठाकरे गटाचे 10 उमेदवार जिंकून आले आहेत. तर काँग्रेसचे 3 उमेदवार जिंकून आले आहेत. शरद पवार गटाला या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नाही.