शरद पवारांना सोडून अजित दादांच्या बंडात साथ देणाऱ्या किती उमेदवारांचा पराभव झाला?

Apart from Sharad Pawar, how many candidates who supported Ajit Dada's rebellion were defeated?

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेत स्वतःचा वेगळा गट केला. तब्बल ४१ आमदारांनी अजित पवारांना या बंडात साथ दिली होती.

 

तसेच आपला गटच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगितले. पुढे विधीमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या दाव्याला पाठबळ देणारे निर्णय दिले.

 

दुसरीकडे शरद पवार आणि त्यांच्या इतर नेत्यांनी पक्षफुटीवर भर देऊन जनतेमध्ये जाऊन प्रचार केला. तरी निकालावरून शरद पवारा गटाला फारसे यश मिळाले नाही

 

असे दिसत आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या उमेदवारांना ‘पाडा, पाडा’ असे सांगूनही अजित पवारांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत.

 

शरद पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, मकरंद आबा पाटील, धनंजय मुंडे आणि इतर आमदारांना पाडण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही या उमेदवारांचा विजय झाला आहे.

 

अजित पवार यांच्या एकूण १३ उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये नुकतेच पक्षात आलेल्या झिशान सिद्दीकी यांचाही पराभव झाला आहे. तर २०१९ चे अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार

 

यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविली होती, त्यांचाही पराभव झाला आहे. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळ मधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.

 

संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांच्यासह आलेल्या भरत गावित, सुनील टिंगरे, लहू कानडे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, यशवंत माने, राजेश पाटील, नजीब मुल्ला आणि नवाब मलिक यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

 

 

अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आलेले असून त्यांनी बंडाच्या वेळी आपल्याबरोबर असलेल्या आमदारांचा आकडा कायम ठेवला आहे.

 

मात्र अजित पवार गटाला ९.०१ टक्के मतदान मिळाले असून शरद पवार यांच्या गटापेक्षा हे मतदान कमी आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ११.२८ टक्के मतदान मिळाले आहे.

 

कोणत्या उमेदवारांचा पराभव

विधानसभा मतदारसंघ उमेदवार निकाल
नवापूर भरत गावित पराभूत
मोर्शी देवेंद्र भुयार पराभूत
वांद्रे पूर्व झिशान सिद्दिकी पराभूत
वडगाव शेरी सुनील टिंगरे पराभूत
श्रीरामपूर लहू कानडे पराभूत
इस्लामपूर निशिकांत पाटील पराभूत
तासगाव कवठे महाकाळ संजयकाका पाटील पराभूत
खेड आळंदी दिलीप मोहिते पराभूत
जुन्रर अतुले बेनके पराभूत
१० मोहोळ यशवंत माने पराभूत
११ चंदगड राजेश पाटील पराभूत
१२ मुंब्रा कळवा नजीब मुल्ला पराभूत
१३ मानखूर्द शिवाजीनगर नवाब मलिक पराभूत

 

 

 

 

.

विधानसभा मतदारसंघ उमेदवार निकाल
अमळनेर अनिल पाटील विजयी
अमरावती सुलभा खोडके विजयी
अहेरी धर्मरावबाबा अत्राम विजयी
लोहा प्रताप चिखलीकर विजयी
सिन्नर माणिकराव कोकाटे विजयी
निफाड दिलीप बनकर विजयी
दिंडोरी नरहरी झिरवाळ विजयी
देवळाली सरोज अहिरे विजयी
शहापूर दौलत दरोडा विजयी
१० अनुशक्ती नगर सना मलिक विजयी
११ श्रीवर्धन आदिती तटकरे विजयी
१२ शिरूर ज्ञानेश्वर कटके विजयी
१३ बारामती अजित पवार विजयी
१४ भोर शंकर मंडेकर विजयी
१५ मावळ सुनील शेळके विजयी
१६ पिंपरी आण्णा बनसोडे विजयी
१७ पारनेर काशिनाथ दाते विजयी
१८ गेवराई विजयसिंह पंडित विजयी
१९ परळी धनंजय मुंडे विजयी
२० उदगीर संजय बनसोडे विजयी
२१ फलटण सचिन पाटील विजयी
२२ येवला छगन भुजबळ विजयी
२३ आंबेगाव दिलीप वळसे पाटील विजयी
२४ कागल हसन मुश्रीफ विजयी
२५ अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले विजयी
२६ माजलगाव प्रकाश सोळंके विजयी
२७ वाई मकरंद पाटील विजयी
२८ अहिल्यानगर शहर (अहमदनगर) संग्राम जगताप विजयी
२९ इंदापूर दत्तात्रय भरणे विजयी
३० अहमदपूर बाबासाहेब पाटील विजयी
३१ कळवण नितीन पवार विजयी
३२ कोपरगाव आशुतोष काळे विजयी
३३ अकोले किरण लहामटे विजयी
३४ वसमत चंद्रकांत नवघरे विजयी
३५ चिपळूण शेखर निकम विजयी
३६ पाथरी राजेश उत्तमराव विटेकर विजयी
३७ हडपसर चेतन तुपे विजयी
३८ इगतपुरी हिरामण खोसकर विजयी
३९ तुमसर राजू कारेमोरे विजयी
४० पुसद इंद्रनील नाईक विजयी
४१ सिंदखेडराजा मनोज कायंदे विजयी

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *