अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं

Ajitdada inaugurated the event before the BJP MPs arrived.

 

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याची पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आज सकाळी 6.30 वाजण्याच्या आधीच कामाला सुरूवात केली.

 

मात्र, कार्यक्रमांची वेळ ही सकाळी 6.30 ठरवलेली होती, मात्र या वेळेआधीच अजित पवारांनी कार्यक्रमांना आणि त्यांच्या कामांना सुरूवात केल्याचं दिसून आलं भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच

 

पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं होतं. पोहोचण्याआधीच अजित पवार यांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यामुळे मेधा कुलकर्णी यांची थोडी चीड चिड झाल्याचं दिसून आलं.

 

खासदार मेधा कुलकर्णी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या, त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी त्यांना सकाळी 6.30 च्या आधी उद्घाटन केलं दादा असं म्हटलं.

 

त्यावर अजित पवारांनी मला माहिती नव्हतं, परत उद्घाटन करू असं म्हटलं. यानंतर अजित पवारांच्या उत्तरावर मेधा कुलकर्णींनी असं कसं म्हटलं. यानंतर पुन्हा अजित पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केलं.

 

नियोजित वेळेपूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी कामांचा धडाका सुरू केला. अजित पवार विभागीय कार्यालयमध्ये दाखल झाले. विभागीय आयुक्तालय येथील महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अजित पवारांनी केलं.

 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार आज सकाळी पुण्यातील सर्व कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

 

सकाळी 6.30 वाजण्याच्या आसपास पुण्यातील विभागीय आयुक्तालयात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचे उद्घाटन केले.

 

त्यानंतर सकाळी 7.10 वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित सिंहगड रोड वरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले.

 

सकाळी 8 वाजता राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसानिमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. हे तीन कार्यक्रम संपल्यावर अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

 

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले आहे.

 

यावेळी अजित पवार यांनी उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

 

2021 मध्ये या पूलाचं भूमीपूजन झालं होतं. 61 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 106 गर्डर उभारले आहेत. आज अजित पवारांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर आता हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *