भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला त्यांच्याच येवला मतदारसंघातील ४६ गावांतील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध

Opposition to Bhujbal's entry by Thackeray's office-bearers in 46 villages of his Yewla constituency

 

 

 

 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची चर्चा असताना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र यास विरोध केला आहे.

 

 

 

भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी सांगितले.

 

 

 

लोकसभा, राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते भुजबळ नाराज असल्याने ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे शुक्रवारी सायंकाळी बेचाळीस गाव शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

 

 

 

यावेळी भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा प्रमुख शिवा सुरासे यांनी प्रास्ताविकात भुजबळ यांनी ठाकरेंसह विविध नेत्यांशी जवळीक सुरू केली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाला भावना समजाव्यात, यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.

 

 

 

 

यावेळी विकास रायते, महिला आघाडीच्या मनीषा वाघ, प्रमोद पाटील, दिलीप चव्हाण, खडक माळेगाव येथील विश्वनाथ चव्हाण, हर्षल काळे यांची भाषणे झाली.

 

 

 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना काय त्रास दिला आहे, ते आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये ही आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी दिली.

 

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ अस्वस्थ असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरु आहेत. सातत्याने डावलले जाण्यापेक्षा वेगळा निर्णय घ्या, अशी भूमिका समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

 

 

 

भुजबळ जो निर्णय घेतील, त्याला समाजातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा असेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला होता. पक्षात सातत्याने डावलले जाणे,

 

 

 

 

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय होणे यामुळे झाले तेवढे ठीक, आता वेगळा निर्णय घ्या, असे आवाहन ओबीसी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केले होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *