दानशूर, देशप्रमी,उद्योगपती रतन टाटांचा साधेपणाने भारतातील इतर उद्योगपतीनी शिकण्यासारखे

Philanthropist, patriotic, industrialist Ratan Tata's simplicity is something to be learned by other industrialists in India

 

 

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती.

 

त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.

 

 

वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. जाणून घ्या रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार

 

बुधवारी रात्री एक दु:खद बातमी समोर आली. देशातील सर्वात मोठे उद्योगपती टाटा रतन यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

 

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर सर्वजण

 

त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसले. राजकारणापासून क्रीडा जगतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

 

रतन टाटा हे स्वतःचे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी नेहमी आपल्या साधेपणाने आणि आपल्या दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली. तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना शिकवताना दिसला.

 

हे महान व्यक्तिमत्व आता आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा आणि महान विचार सदैव आपल्यात राहतील. जाणून घ्या रतन टाटा यांचे असे 10 प्रेरणादायी विचार

 

रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार
तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.

 

तुमचे जीवन चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा.

टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.

 

 

जे लोक इतरांची कॉपी करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात, परंतु ते आयुष्यात फार प्रगती करू शकत नाहीत.

सांत्वनाची बक्षिसे फक्त शाळेतच दिसतात. काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात. पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही.

 

 

योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.

आपण माणसं आहोत, संगणक नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका.

 

 

चांगले अभ्यास करणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.

जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा.

तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितके निष्पक्ष राहा.

 

 

 

रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं होतं. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असंही बोललं जायचं.

 

रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते.

 

रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

रतन टाटा यांची कारकीर्द-
– जन्म – 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष

– 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू

1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं

 

 

– चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली

– 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)

 

 

– एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली

– 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली

 

 

– 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला

– मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी

 

 

– नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन

– रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *