उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !
Uddhav Thackeray's attack on Eknath Shinde

मुंबईमधील वरळी डोम परिसराला आज जणू आनंदाचे भरते आले होते. गेल्या 18 वर्षानंतर मनसे आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले. सभागृह आणि बाहेरील परिसर मनसैनिक, शिवसैनिकांनी तुडुंब भरला होता.
हा एका पक्षाचा सोहळा नव्हता. पण दोन्ही भावांनी एकाच पक्षात असावा, असा सूर आणि संकेत या विजयी मेळाव्यातून दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाग्बाण सोडले.
जून मध्येच राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ
त्यांच्या शाब्दिक फटकेबाजीने परिसर दणाणला. सरकारला दोघांनी धारेवर धरलेच. पण मराठी, मराठी माणूस या अस्मितेसाठी एकत्र आलो आणि आणि आता एकत्र राहणार अशी ग्वाही दिली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. एक गद्दार काल म्हणाला ‘जय गुजरात’. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चर पाहिला झुकेगा नाही साला.
आता हे गद्दार म्हणतात उठेगा नही साला. उठायला आहे काय तुझ्याकडे. कसं उठणार तुझं. विचार म्हणतोय, अशी बोचरी टीका त्यांनी शिंदेवर केली.
मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा पाईक असेल का, असा सवाल त्यांनी विचारला. म्हणून म्हणतो डोळे उघडा. आताच जागी व्हा.
ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,
आता येणारी जाग जाणार असेल तर मग मात्र मराठी आईची मुले म्हणू नका. शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की अन्याय करू नका. पण अंगावर हात उद्गारला तर तो जागेवर ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल
फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही म्हणता, एक मराठी माणूस दाखवा इतर राज्यात गुंडगिरी करणारा. मराठी माणसाने दादागिरी केली तर त्याला तिकडे उभं चिरून टाकली.
मग आमच्या घरात न्याय हक्काची गोष्ट सुरू केली तर. बिघडलं कुठे. राजने सांगितलं तसे आमचे सर्वांचे इतर अमराठी मित्र आहेत. तुम्ही आमच्या विष टाकता. तुमचे डाव उघड झाले आहे.
महाराष्ट्राला आवाहन करतो. कोणत्याही पक्षाचे असू आपण एकजूट केली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपच्या मराठी माणसानेही त्यात आलं पाहिजे.
शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
का नाही यायचं. ज्या राज्यात राहता, मातीत जन्माला आला त्याचे धिंडवडे काढणार असतील, त्यांना पायघड्या टाकणार असू तर असे षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेललं बरं, असे ते म्हणाले.
मी राज ठाकरेंना परवा फोन केला. अरे आपल्या पिक्चरचं प्रिमीयर असल्यासारखं विचारताहेत आत कसं येऊ. हा प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका
आजपासून सुरुवात झाली आहे. एकत्र आम्ही दादागिरी करणार नाही. कुणी दादागिरी केली तर सहनही करणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तेच सांगतो. मराठा मराठेत्तर,
ब्राह्मण ब्राह्मणेत्तर, स्पृश्य अस्पृश्य आणि घाटी कोकणी हे भेदाभेट मिटवून एक या. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.








