शरद पवार म्हणतात “साखरेचे दर वाढवा” कारखान्यांना नुकसान होतेय
Sharad Pawar says, "Increase sugar prices; the factories are incurring losses."

‘उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) आणि साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) यामध्ये फरक असल्याने साखर उद्योगाचे नुकसान होत आहे.
मोठी बातमी; शिंदेसेना–भाजप युती तुटली
साखर उद्योगाचे प्रश्नः तसेच साखरेची किमान विक्री वाढविण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार आहोत,’ असे माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सांगितले.
उमेदवारी न मिळाल्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
‘साखरेचा विक्री दर वाढविण्याची गरज असून उद्योगासमोर इतरही अनेक प्रश्न आहेत. राज्यातील मंत्री आणि राष्ट्रीयः तसेच राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ घेऊन मी सरकारशी चर्चा करणार आहे.
शक्तिशाली ‘बॉम्ब’ चक्रीवादळ ; 48 तास धोक्याचे
अनुकूल आणि शेतकरी हिताचा निर्णय होईल, याची काळजी घेऊ,’ असे आश्वासन पवार यांनी दिले. ऊसगाळप आणि साखर विक्रीतील वस्तुस्थिती याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका मांडल्यानंतर पवार यांनी तोडगा काढण्याचे आश्नासन दिले.
‘सध्या कारखान्यांना किरकोळ साखर विक्रीचा दर ३ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल इतका आहे. किमान विक्री दर ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी आहे. गाळप हंगाम सुरू असून लवकर निर्णय झाल्यास कारखान्यांना फायदा होईल,’ असे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. शेतकरी केळीऐवजी ऊस पिकाकडे वळत आहेत. उसाचे उत्पादन वाढत आहे.
मात्र, सध्या साखरेचा वापर कमी होत आहे. साखर मुक्त शीतपेयांची मागणी होत आहे. काही देशांमध्ये साखर आरोग्यासाठी हानिकारक आहे, असा प्रचार केला जात असल्याने साखर उद्योगापुढे आव्हान निर्माण झाले आहे,’ अशी भीती हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा ,काय असेल फार्मुला ?
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सोमवारी झालेल्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील,
माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे,
जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO
‘व्हीएसआय’ चे महासंचालक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, विवेक कोल्हे, श्रीराम शेटे आदी या वेळी उपस्थित होते.









