दारुण पराभवानंतर काका- पुतण्यामध्ये दिड तास बैठक , पुढचा प्लॅन ठरला?

After the crushing defeat, a one-and-a-half-hour meeting took place between uncle and nephew; was the next plan decided?

 

 

पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन पक्ष एकत्र आले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच प्रचाराचा दिसत होता.

मराठवाड्यातील अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा अचानक मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या पालिकेतील कारभारावर प्रचारा टीका केली होती. अजित पवार यांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो, पीएमपी बस देण्याची घोषणा केली होती.

 

या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं,” आणि मोफत योजनेवरून खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

इराणची अमेरिकेवर मोठी मात

त्यावर भाजपने पालिकेच्या तिजोरीत आणा ठेवला नाही. मी बाजीराव आहेच, असे प्रतिउत्तर दिले होते, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ३० जागा मिळाल्या, त्यामुळे घडळ्याचे काटे उलटे फिरले.

 

हा निकाल अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला मोठा धक्का आहे. तर आता पुन्हा नव्या दमानं उतरण्यासाठी आज या पक्षातील मुख्य नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे.

 

बारामती कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांसह अजित पवार आणि दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची भेट झाली, या भेटीवेळी नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

बापरे…! मराठवाड्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोविंद बागेत नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते, या भेटीवेळी झेडपी निवडणुकीसदंर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

अजित पवार आणि शरद पवारांची गोविंद बागेत दीड तास चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादींना महानगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणावं तस यश मिळालं नाही.

 

पंचायत समितीमध्ये स्थानिक नेत्यांना विचारुन एकत्र लढायचं की नाही ठरवणार असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे सर्वजण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले आहेत.

महापालिका निवडणुकीवरून राहुल गांधी म्हणाले ही लोकशाहीची थट्टा

स्थानिक पातळीवरचा आमचा निकाल मान्य आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत काही दिवसात ठरेल, विलीनकरणाबाबत चर्चा नाही अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

 

तर भेटीबाबत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, समविचारी मतदारांची विभागणी टाळण्यासाठी

भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत असे उत्तर दिले.

 

 

Related Articles