उमेदवाराला शून्य मतदान, ‘माझं स्वत:चं मतदान कुठे गेलं’ची पोस्ट व्हायरल, ईव्हीएम मशीनबाबत संशय,

A candidate receives zero votes, a post asking 'Where did my own vote go?' goes viral, raising suspicions about the EVM machine.

 

 

निवडणुकांमधील EVM मशीनच्या मुद्यावरुन अनेकदा आरोप-प्रत्यारोप आणि शंका उपस्थित केली जाते. तर याच मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचे 3 हिंदू उमेदवार विजयी

दुसरीकडे ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळो वेळी देण्यात आलं आहे.

ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ

असे असताना जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला पोस्टलमध्ये शून्य मतदान मिळाल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. सध्या या पोस्टची समाज माध्यमांवर चर्चा रंगू लागली आहे.

आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगामध्ये मृत्यू

दरम्यान, सुनंदा फेगडे यांना शून्य मतदान झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये दिसणाऱ्या यादीत सुनंदा भागवत फेगडे यांच्या नावासमोर शून्य मतं दिसत होती.

महापालिका निवडणुकीत भाजप-MIM युती

त्यामुळे सुनंदा भागवत फेंगडे यांचे स्वत:चे मत कुठे गेले, असा सवाल निर्माण झाला होता. मात्र, आता या प्रकारातील नेमके सत्य समोर आले आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मतांची आकडेवारी ही पोस्टल मतांची आहे. सुनंदा फेगडे यांना शून्य पोस्टल मतं मिळाली होती. तर ईव्हीएम मतदानात सुनंदा फेगडे यांना 92 मतं मिळाली.

 

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती
‘माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत तर मी मला दिलं होतं, मग ते मत कुठे गेलं?’आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं? मत EVM मध्ये गेलं कि निकाल भाजपला गेला आणि प्रश्न विचारला की निवडणूक आयोग शांत. उत्तर मात्र भाजपकडून येतं! म्हणजे, EVM सरकारी,

 

निवडणूक आयोग घटनात्मक, पण स्पष्टीकरण मात्र पक्षीय. आजची लोकशाही अशी झालीय की बटन मतदार दाबतो निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

भाजपमधून माजी महापौरांसह 54 जणांची हकालपट्टी
मी मला मत दिलं होतं, ते मत दिसत नाही. पण आयोग म्हणतो EVM सुरक्षित आहे. भाजप म्हणतो जनतेचा कौल आहे. मग प्रश्न असा पडतो फेगडे बाईंचं मत अवैध होतं का?

 

की मतदाराचाच कौल आता गरजेचा उरलाय नाही? आज EVM वर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा झाला असल्याचेही पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी

 

Image

 

 

Related Articles