दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी सर्वात मोठी अट
The biggest condition for both nationalists to unite

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनिकरणाची चर्चा सुरू होती आणि लवकरच त्याविषयीची घोषणा दिवंगत अजितदादा पवार करणार होते असा दावा पुढे आला. त्यावर अजितदादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवले.
विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित
त्यानंतर काल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुद्धा या चर्चांना काही अर्थ नसल्याचे संकेत दिले. तर आज शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याचे पुन्हा सांगितले.
आता या सर्व प्रकरणावर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी विलीनिकरणाचा चेंडू शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोर्टात टोलावला. खास मुलाखतीत त्यांनी अनेक विषयावर आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित
सुनील तटकरे यांनी गेल्या दोन-चार दिवसातील घडामोडींचा आढावा घेतला. त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर होत असलेल्या टीकेवरही मत व्यक्त केलं.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. तर त्याचवेळी तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाबाबत मोठे भाष्य केले.
विलीनिकरण हा हायपोथेटीकल दाब आहे. राष्ट्रवादी हा एनडीएचा भाग आहे. मी एक प्रश्न वारंवार विचारत आहे की कुठल्या आणि कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार. पण त्यावर कोणीच उत्तर देत नाही.
महापालिकेच्या १६ नगरसेवकांवर निलंबनाची मागणी
मला त्यामागील कारणमीमांस कळाली नाही. तर विलीनिकरणाची ही चर्चा कोण, कुठल्या टप्प्यात सुरू करणार हे पुढे आहे. मी गेल्या दहा महिन्यांपासून हे म्हणच आलोय की, भारतीय जनता पक्षासोबत आम्ही आहोत,
हे ज्यांना मान्य असेल तेच विलीनिकरणाबाबत अथवा सोबत येण्याविषयीची चर्चा करू शकतात. नाहीतर चर्चा करण्याचा काही प्रश्नच नाही. हे जर मान्य असेल तर त्याविषयीच्या चर्चा कधी केव्हा कोण करणार हे मला आता सांगता येणार नाही असे मोठे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले.
माझा विरोध आहे की नाही हा मुद्दा अत्यंत गौण आहे. 40 वर्षांपासून मी दादांसोबत काम करत आलो आहे. मी दादांचा विश्वासू सहकारी म्हणून माझ्यावर अनेकदा आक्षेप घेतल्या गेले.
‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात
उद्या मी त्याला उत्तर देईल. पण विलीनिकरणाविषयी अजितदादांचा निर्णय झाला असता तर माझा त्याला विरोध असण्याचे कारण नव्हतं, असे तटकरे म्हणाले. दादांना विश्वास नक्की होता तटकरेंना मी सांगेल ते तो मान्य करेल. दादांची आणि माझी चर्चा व्हायची त्यावेळी मी मत मांडायचो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे-पिंपरी चिंचवड पालिका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला.विलीनिकरणाच्या बाबतीत दादांनी स्पष्ट भूमिका मांडली. दादांनी मला जरुर, तो व्हीडिओ फिरतोय त्या आधी माझी आणि दादांची भेट झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचं याबाबत सांगितलं. तर विविध वाहिन्यांवर दोन्ही एकत्र येण्याविषयी दादांनी स्पष्ट भू्मिका मांडल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली.
विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात मोठी घोषणा
दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनिकरणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. आतापर्यंत अजितदादा गट या चर्चांवर कानावर हात ठेवत आला आहे. अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे दोन्ही राष्ट्रवाद एकत्रिकरणाची प्रक्रिया मध्येच थांबल्याचा दावा करण्यात येत आहे.
जितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आतापर्यंत विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत होते. आता ते दोन पावलं पुढं सरकली आहेत. त्यांनी आता विलीनीकरणासाठी अटी घालायला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशीच अट सकाळी दिलेल्या मुलाखतीत घातली.
तर आता विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी तर तीन अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जणू संकेत देण्यात येत आहेत.
48 तासानंतर धक्कादायक खुलासा: :ऐनवेळी बदलला होता अजित पवारांच्या विमानाचा पायलट
अजितदादा पवार कधीही दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत आमच्याशी बोलले नाही असा दावा राष्ट्रवादी दादा गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. तर विलीनिकरणाची १२ फेब्रुवारी ही तारीख ठरली नव्हती, तारीख ठरली असती तर दादांनी आम्हाला सांगीतलं असतं असे आत्राम म्हणाले.
दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात याविषयीची चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. तर त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी काही चर्चा सुरू नसल्याचा दावा केला.
दादांनी याविषयीची कोणतीही कल्पना दिली नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी आम्ही NDA चे घटक पक्ष आहोत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत याचचे आहे. त्यांना एनडीएसोबत यावे लागेल अशी अट त्यांनी घातली.
राजकीय घडामोडींना वेग, CM फडणवीसांसोबत सव्वा तास चर्चेत काय झालं?
तर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा तीन अटी घालण्यात आल्या आहेत. या तीन अटी मान्य असतील तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकतं असे संकेतच त्यांनी दिले. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आतापर्यंत कानावर हात ठेवणारे नेते आता विलीनीकरणासाठी अटी घालत असल्याचे दिसत आहे.
1. दोन ताईंपैकी सुनेत्रा ताई आमच्या नेत्या आहेत. आम्ही आमचा नेता निवडला आहे. आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर, सुप्रिया ताईंचा रोल काय राहील हे ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा ताई यांच्याकडे असेल अशी अट आत्राम यांनी पुढे केली.
उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांचा शपथविधी संपन्न
2. आम्हाला एनडीए सोबत रहायचं आहे. आमचं चिन्ह घडी आहे. या चिन्हाखाली त्यांनी एकत्र यावं शरद पवार गटाने घडी स्वीकारून एकत्र यावं, सुनेत्रा ताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.
3. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर एनडीए सोबत राहणं गरजेचं आहे, अशी तिसरी अट धर्मराव बाबा आत्राम यांनी घातली. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही असा दावा त्यांनी केला.








