मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अजितदादांच्या सह्या केल्या
Senior officials in the ministry signed Ajit's signatures.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या काही तासांतच अल्पसंख्याक विभागाच्या ७५ विचाराधीन असलेल्या फायलींवर अधिकाऱ्यांनी सह्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार
ज्या फायलींवर मंत्री म्हणून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे विचार करीत होते, त्याच फायलींवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना संवेदना नावाची गोष्ट उरली आहे की नाही? असा सवाल जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अधिकाऱ्यांच्या प्रतापावर संताप व्यक्त केला आहे.
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली.
राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले असताना मात्र मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने फाईलींवर सह्या करून ‘स्वार्थ’ पाहिल्याची चर्चा आहे.
मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video
अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेगाने विचाराधीन फायलींवर अधिकाऱ्यांकडून सह्या केल्या गेल्या ते पाहता सगळंच वंगाळ झालंय, असा वाटायला लागलंय अशा संतप्त भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या.
सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.
धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग:VIDEO
अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने पुतण्या रोहित पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. अजित पवार यांचा मृत्यू हा घात की अपघात असा प्रश्न विचारून त्यांनी सनसनाटी दावे करणारी पत्रकार परिषद घेतली. माझा काका गेलाय, सरकारला उत्तरे द्यावीच लागतील म्हणून त्यांनी व्यवस्थेवर दबाव आणला.
अल्पसंख्याक विभागाने स्थगित असलेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक संस्था किंवा शाळांचा दर्जा दिला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे अजित पवार यांचे ज्यादिवशी निधन झाले,
११ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; पुन्हा थंडीचा जोर वाढणार
त्याच दिवशी सात संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच इतरही संस्थांना परवानगी दिल्याच्या तारखा या दुखवट्यादरम्यानच्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातूल कोणत्या अधिकाऱ्याने हे कारस्थान केले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्या निधनाला काही तास उलटत नाही तोच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या संबंधित नस्तींवर (फाईल) वायूवेगाने स्वाक्षरी केल्याने राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे या सर्व नस्ती सरकारच्या विचाराधीन होत्या. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत
अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे प्रकरण समोर आले होते. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील विविध शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळाला.
विशेष म्हणजे या सर्व फाईल अजित पवार यांच्या विचाराधीन होत्या. परंतु मागचा पुढचा विचार न करता अधिकाऱ्यांनी संबंधित फाईलवर सह्या केल्या.
दादांच्या निधनानंतर काही तासांतच सात फाईलींवर स्वाक्षरी करून संबंधितांना दिलासा देण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. यासंबंधीचे आदेश देणारे वरिष्ठ नक्की कोण? कुणाच्या सूचनांनी मंत्रालयातील सूत्रे हलली? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन स्वाक्षरी केलेल्या फाईलींना स्थगिती दिली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.
२८ जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शासकिय दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि मंत्रालयाला त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. याच दिवशी अल्पसंख्याक विभागाने स्थगित असलेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा दिला गेला.
परवानगी दिल्याच्या तारखा या दुखवट्याच्या तारखा असल्याने मंत्रालयातूल कोणत्या अधिकाऱ्याने हे कारस्थान केले याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे यातील काही नामांकित शाळांचा समावेश आहे ज्या अल्पसंख्याक कश्या होऊ शकतात असा एक स्वतंत्र सवाल उपस्थित होतो.
अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेगाने विचाराधीन फायलींवर अधिकाऱ्यांकडून सह्या केल्या गेल्या ते पाहता सगळंच वंगाळ झालंय,
असा वाटायला लागलंय अशा संतप्त भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.









