एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांना नारळ देणार; मंत्रिमंडळात लवकरच उलटफेर

Eknath Shinde to drop two ministers; cabinet reshuffle imminent.

 

 

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि आपल्याच पक्षातील (शिंदे गटातील) दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर होत असलेल्या आरोप आणि 2 मंत्र्यांवर जिल्ह्यात पक्षाची कमी होत असलेली ताकद पाहता एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत आलेले निकाल पाहता, शिवसेनेतील अकार्यक्षम दोन मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेच्या 9 जागासाठी होणार निवडणूक ,कोणाची लॉटरी लागणार ?

लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. या निवडणुकीत शिंदे पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात प्रचारासाठी गेले.

 

मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यांत तळ ठोकून असतानाही पक्षाच्या जागा आल्या नाहीत. नागपूर अधिवेशनावेळीच शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असताना,

मंत्रिपदावरुन कोकाटेंचा पत्ता कापण्यात खरातची भूमिका

जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता, पक्षात नाराजी नाट्य नकोच म्हणून फेरबदल केले नाहीत. मात्र जिल्हापरिषदेपूर्वी शिंदेंनी मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिले होते. मात्र जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणूकीतही काही मंत्र्यांना आपला गड राखता आला नाही.

 

एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडे महत्वाची मंत्रीपद असताना त्यांना राज्यभरात चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर शिंदेकडून आता अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका

येणाऱ्या काही दिवसांत शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या व पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रीपदाची धुरा देण्याची शक्यता आहे.

 

यासाठी काही इच्छुक शिंदेकडे लॉबिंग ही करत असल्याचे कळते. आता शिंदे सेनेच्या मंत्री मंडळात कोणाला लॉटरी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

 

ट्रम्पच्या डेप्युटीने इराण युद्धावरुन PM नेतान्याहूंना सुनावलं
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.

 

दीपक केसरकर यांना पक्षातील वरिष्ठांकडून समज देण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणली असं अनेक नेत्याचं मतं आहे. तर अशोक खरातवर कडक कारवाई व्हावी असं पक्षांमधील बड्या नेत्यांचा मत असल्याचं समोर येत आहे.

आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक

Related Articles