जगावर मोठं संकट! एलपीजी गॅससह तेलाचा पुरवठा खंडीत
Major Global Crisis! Oil and LPG Gas Supplies Disrupted.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मोठी घोषणा करत म्हटले होते की, होर्मुज खाडी खुली आहे. त्यानंतर जगाने सुटकेच्या निश्वास घेतला.
अराघची यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचे स्वागत केले आणि आभारही मानले. हेच नाही तर यादरम्यान जागतिक बाजारात 10 टक्क्यांनी तेलाच्या किमती घसरल्या.
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कसे राहणार? हवमान विभागाचा चिंता वाढविणारा अंदाज
आता सर्वकाही सुरळीत होणार असे जगाला वाटत होते, त्यावेळीच इराणच्या होर्मुज खाडीत भयंकर घडले. भारताच्या जहाजावर होर्मुज खाडीत गोळीबार करण्यात आला.
हेच नाही तर आयआरजीसीच्या अधिकाऱ्यांनी भारतीय जहाजाच्या कॅप्टनला होर्मुज खाडी बंद असल्याचे सांगितले. गेल्या 24 तासांपासून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे.
नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू;पाहा VIDEO
एलपीजीचे मोठे संकट आहे. 24 तासांमध्ये सर्वकाही बदलल्याचे दिसत आहे. जगाने ज्याचा विचारही केला नाही, असा निर्णय इराणकडून घेण्यात आला.
इराणकडून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली. शनिवारी सर्वकाही व्यवस्थित होते आणि त्यानंतर सर्व बदलून गेले. पुन्हा जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने एक थेट निवेदन जारी करून म्हटले की, होर्मुजच्या खाडी जवळ जाणे हे शत्रूशी सहकार्य मानले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जातील.
केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरबाबतची नवी अपडेट
IRGC ने म्हटले की, जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत होर्मुजमध्ये कठोर उपाययोजना केल्या जातील. अमेरिका आणि इराण यांच्या वादात गेल्या 24 तासांपासून होर्मुज खाडी बंद आहे. याचा मोठा फटका बसत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने चीन, भारत, पाकिस्तान सारख्या देशाची झोप उडाली.
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठक ?
मित्र देशांचेही जहाज इराणकडून सोडले जात नाहीये. परिस्थिती अधिक बिकड बनली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरू व्हावी, ही जगाची इच्छा आहे.
होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली, एलपीजीचे संकट आहे. 24 तासात असे काही घडले, ज्याचा जगाने विचारही केला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण जगाला होर्मुजच्या माध्यमातून ब्लॅकमेल करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान









