राष्ट्रवादी कडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी जबाबदारी
NCP entrusts Zeeshan Siddique with a major responsibility once again.

‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलत पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिल्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांच्याकडून झिशान सिद्दिकी यांना मुंबई अध्यक्षपदावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
काॅकरोच’ वक्तव्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा एकदा खुलासा
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्षपद दोन वर्षांपासून रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त होतं. झिशान सिद्दिकी यांना अध्यक्षपद मिळाल्यास मुंबई राष्ट्रवादीत नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे.
समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील २ वर्षापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. पार्थ पवारांकडून आपल्या विचाराचा युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष आणि विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर आता मुंबई अध्यक्ष नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला देण्यात आली आहे.
झिशान सिद्दिकी यांना आमदारकी पार्थ पवार यांच्या मागणीवरुन देण्यात आली होती. आता मुंबई अध्यक्षपद सिद्दिकी यांना देण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.
आता सीजेपीच्या मागे लागली ईडी…पडद्यामागे मोठ्या हालचाली!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुंबईत दोन कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. त्यापैकी एकाला अध्यक्षपदी नेमण्यात यावं, अशी मागणी होती. ती मागणी डावलत खासदार पार्थ पवार यांच्याकडून झिशान सिद्दिकी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळं हा संघर्ष वाढताना दिसण्याची शक्यता आहे.
झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेची आमदारकी देताना पक्षातील मोठ्या नेत्यांनी विरोध केला होता. झिशान सिद्दिकी पक्षात नवे आहेत, याशिवाय विधानसभेला ते निवडून आले नव्हते.
त्यामुळं सिद्दिकी यांना विधानपरिषद का द्यायची असा सवाल त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा झिशान सिद्दिकी यांना प्राधान्य का दिला जातोय,
सावजी मटण मुळे तुकाराम मुंडे अडचणीत
असा सवाल मुंबई राष्ट्रवादीमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळं आगामी काळात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांचा पक्षातील निर्णयांवर प्रभाव असल्याचं गेल्या काही दिवसांमधील घडामोडींवरुन दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती.
सावजी मटण मुळे तुकाराम मुंडे अडचणीत
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक नियुक्त्यांवर पार्थ पवार यांचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं होतं. पार्थ पवार यांच्या विचाराचे युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष आणि विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली होती.
युवती अध्यक्ष म्हणून निर्मला नवले आणि विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आकाश झांबरे पाटील यांची निवड करण्यात आली होती.









