निवडणूक आयोगाकडे पहिली तक्रार रोहित पवारांच्या विरोधात ;पाहा काय आहे प्रकरण ?

First complaint to Election Commission against Rohit Pawar; see what the case is

 

 

 

 

 

नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. प्राण्याचा गैरवापर केल्याने निषेध दर्शवत

 

 

 

 

‘पेटा इंडिया’ने (पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. आता निवडणूक आयोगाकडील तक्रारीविरोधात रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये खेकडा घेऊन आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली होती. यावर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

 

 

 

यावर त्यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्या खेकड्याचं नेमकं काय केलं? हे देखील रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

 

 

 

 

 

रोहित पवारांनी X या सोशल मीडियावर पोस्ट केलं की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा दाखवला.

 

 

 

 

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता. नंतर तो नदीत सोडून दिला, त्यामुळं खरंतर त्या खेकड्याचा जीव वाचला.

 

 

 

पण तिकडं भाजपची यामुळं तडफड सुरू झाली आहे. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

 

पेटा या प्राणीमित्र संघटनेने रोहित पवारांविरोधात निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र लिहून राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे.

 

 

 

 

पेटाने आपल्या पत्रात म्हटलंय की, सन २०१३ मध्ये जाहीर अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक प्रचारादम्यान प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली होता.

 

 

 

 

उल्लंघन करणाऱ्यांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. पेटाने रोहित पवारांना देखील पत्र लिहून त्यांच्याकडील खेकडा आमच्याकडे सोपवावा, आम्ही त्याची देखभाल करु, असे पत्रात म्हटले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *