नेत्याचा मोठा आरोप ;अजित पवारांमुळे माझी किडनी खराब झाली

Leader's big allegation: Ajit Pawar damaged my kidney

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे माझी किडनी खराब झाली, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे.

 

 

 

किडनी खराब झाल्यानंतर मला ओपन-हार्ट सर्जरी करावी लागली, असं सुद्धा शिवतारे यांनी म्हटलं आहे. मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणारच, असंही विजय शिवतारे यांनी ठामपणे सांगितलं आहे.

 

 

 

 

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शुक्रवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शिवतारे म्हणाले,

 

 

 

 

“मी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत त्यांना माहिती दिली”.

 

 

 

 

 

“बारामतीत पवार कुटुंबीयांविरोधात मतदारांची नाराजी आहे. त्यांची विरोधात मतदान करण्याची तयारी आहे. त्यामुळे आपण बारामतीत योग्य उमेदवार उभा करून लोकांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी,

 

 

 

 

असं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितलं. आपण इतर नेत्यांसोबत चर्चा करून याचा निर्णय घ्यावा”, असंही मी त्यांना सांगितल्याचं शिवतारे म्हणाले.

 

 

 

पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, “जेव्हा लोकांच्या हितासाठी मी गोंदवलीचे पाणी मिळाले यासाठी उपोषण करत होतो, त्यावेळी पालकमंत्री असताना अजित पवार आले तर नाहीच.

 

 

 

 

पण त्यांनी मंत्री रामराजे निंबाळकर यांनाही येऊ दिलं नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मला सांगितलं की, आम्ही काय करणार पाणीपुरवठ्याचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे”.

 

 

 

“परिणामी उपोषण केल्याने माझी किडनी गेली, याचे कारण फक्त अजित पवार आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकांसह अख्ख्या महाराष्ट्राला या गोष्टीची माहिती आहे”, असा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला.

 

 

 

 

“किडनी गेल्यामुळे माझं हार्ट गेलं आणि मला ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. आजही मी डायलिसिवर आहे. एवढं सगळं असताना देखील अजित पवार आपला उर्मटपणा सोडत नाहीत”, अशी टीका देखील विजय शिवतारे यांनी केली.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *