मराठवाड्यात मान्सूनचे आगमन;शेतकऱ्यांना पेरणीबाबत कृषी विद्यापीठाच्या महत्वाच्या सूचना
Arrival of Monsoon in Marathwada; Important instructions from Agricultural University to farmers regarding sowing

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 व 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. दिनांक 11 जून रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी
तर दिनांक 12 जून रोजी नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 11 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात बऱ्यच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 12 व 13 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 व 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. दिनांक 11 जून रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी
तर दिनांक 12 जून रोजी नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 11 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात बऱ्यच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 12 व 13 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात 3 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 4 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील चोवीस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनूरी, वसमत, सेनगाव ; बीड जिल्हा : वडवणी ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हतगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.
संदेश :
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी,
आंबा व सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात
जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि
3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते.
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर, बाजरी, नाचनी, राजमा, चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि शेवग्याची पाने यांचा वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कृषि अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.