अस्मानी संकट; अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
Asmany Crisis; Met department warning of heavy rain
देशभरात आता हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे.मात्र अजूनही काही राज्यांच्या तुरळक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच आहे
.यातच आता हवामान विभागाकडून कडून मोठी अपडेट समोर आली आहे. देशात पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
ईशान्य मोसमी हंगामात हिंदी महासाहरात वाऱ्यांची घणता जास्त असते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये काही वेळा चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते.मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता.
ऑक्टोबरमध्ये चक्रीवादळ आपवादात्मक स्थितीमध्ये येतात, यावर्षी ऐन पावसाळी हंगामामध्ये दाना चक्रीवादळ आलं.
दाना चक्रीवादळामुळे मोठं नुकसानं झालं.बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या किनारी प्रदेशांमध्ये या चक्रीवादळानं धुमाकूळ घातला.दान चक्रीवादळ हे 24-25 ऑक्टोबरदरम्यान मध्यरात्री
धामरा बंदाराच्या जवळ ओडिशाच्या किनार पट्टीला धडकलं.दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुन्हा एकदा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ 21 ते 23 नोव्हेंबरपर्यंत तीव्र होऊ शकते. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा
नवीन चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत मिळत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीवर किती प्रभाव पडणार याबाबत अजून हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 नोव्हेंबरपासून अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण भागात हे चक्रीवादळ सक्रीय होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 22 ते 23 नोव्हेंबरला अधिक गतिमान होईल.
चक्रीवादळाच्या परिणामामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन जोरदार पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा श्रीलंकेला बसणार असल्याचंही हवामान विभागनं म्हटलं आहे.