पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस;हवामान खात्याचा इशारा

Heavy rain for the next five days; Meteorological Department warns

 

 

 

 

 

मान्सूनची वाट पाहत असलेल्या नादगरिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर भारतात पावसाला सुरुवात होणार आहे.

 

 

 

त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. केरळ, कर्नाटक, कोकण, गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार

 

 

 

ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान 20 राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

गेल्या २४ तासात अनेक भागात अजूनही उष्णतेची लाट होती. ज्यामध्ये दक्षिण उत्तर प्रदेश, ओडिशा याचा समावेश आहे. तर पश्चिम राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश,

 

 

 

उत्तर मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पूर्व राजस्थान आणि गुजरातमध्ये ४०-४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय, कोकण, गोवा,

 

 

 

मध्य महाराष्ट्र, बिहार, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, उप हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड, पूर्व मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.

 

 

 

 

हवामान खात्याने माहिती दिली की, नैऋत्य मान्सून आता महाराष्ट्र, विदर्भाचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उप हिमालयीन पश्चिम बंगाल,

 

 

 

झारखंडच्या काही भागात पोहोचला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून गुजरात, उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात पोहोचणार आहे.

 

 

 

 

हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.

 

 

 

 

बिहार, झारखंड, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटांवरही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र

 

 

 

आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, कोस्टल आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल येथेही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.

 

 

 

उत्तर भारतात जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *