सोयाबीन,सूर्यफुलाचे तेल स्वस्त होणार

Soybean and sunflower oil will become cheaper

 

 

 

देशातील सर्वाधिक मागणीच्या पामतेलाची आयात १४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. जानेवारीमध्ये भारतात २.७२ लाख टन पामतेलाची आयात झाली.

 

हा आकडा डिसेंबरच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी कमी आहे. सूर्यफुल व सोयाबीन तेलाच्या आयातीचे दर स्वस्त झाले असून देशांतर्गत तयार होणाऱ्या मोहरीचे उत्पादनही चांगले झाले आहे. त्याचा हा परिणाम आहे. आयात घटल्याने येत्या काळात खाद्यतेल पाच ते १० रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.

भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल सेवन करणारा देश आहे. त्यामध्ये सर्वाधिक सेवन पामतेलाचे होते. भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत जवळपास ६५ टक्के आयात ही पामतेलाचीच असते.

 

मात्र पामतेलाच्या आयातीचे दर महागले की, सोयाबीनची आयात वाढू लागते. सध्या हीच स्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘जानेवारीमध्ये भारतात २.७२ लाख टन पामतेलाची आयात झाली. इतकी कमी पामतेलाची आयात या आधी केवळ २०११मध्ये झाली होती. तर ऑक्टोबर २०२४ या एकाच महिन्यात विक्रमी ७.५० लाख टन पामतेलाची आयात झाली.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर आज पामतेलापेक्षा रशिया, युक्रेन व अर्जेंटिनाहून येणारे सूर्यफुल तेल व आफ्रिकेतून येणारे सोयाबीन तेल स्वस्त आहे. त्यामुळेच पूर्व आशियातील देशांमधून येणाऱ्या पामतेलाच्या आयातीत घट झाली आहे,’

 

जानेवारी महिन्यात एकीकडे पामतेलाची आयात घटली असताना सोयाबीन तेलाच्या आयातीत चार टक्क्यांची वाढ होऊन ती ४.३८ लाख टनांच्या घरात गेली आहे. हा आकडा सात महि़न्यांतील सर्वाधिक आहे. तर सूर्यफुल तेलाची आयातदेखील ९.५० टक्क्यांनी वाढून २.९० लाख टनावर पोहोचली आहे.

पामतेलाच्या आयातीत घट झाल्याने एकूणच खाद्यतेलाची आयात १५.६० टक्क्यांची कमी होऊन १० लाख टनांवर आली आहे. हा आकडा ११ महिन्यांतील सर्वांत कमी असल्याचे खाद्यतेल महासंघाचे म्हणणे आहे.

मोहरी तेलबियांच्या उत्पादनात वाढभारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पामतेलाऐवजी अनेक ठिकाणी मोहरीच्या तेलाचा वापर होतो. त्यात यंदा मोहरीच्या उत्पादनात चांगली वाढ असून ११० लाख टन तेलबिया उपलब्ध आहेत.

 

त्यातून समाधानकारक खाद्यतेल तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळेही पामतेलाच्या आयातीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *