थंडीचा जोर वाढला पाहा तुमच्या जिल्ह्यात कशी असेल हवामानाची स्थिती?
See how the weather will be in your district as the cold weather increases?
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
एकिकडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या तापमानाच घट नोंदवली जात असतानाच दुसरीकडे मात्र पावसाच्या हजेरीनं हवामान विभागाचंही लक्ष वेधलं आहे.
गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहिल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिनाडू क्षेत्रावर सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप दाक्षिणात्य किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच समुद्रावरून य़ेणारं बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असून, त्यामुळं इथं ढगाळ वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
या स्थितीमुळं राज्याच्या सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकिकडे राज्यात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणारे वारे आणि पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे ही बाबसुद्धा नाकारता येत नाही.
येत्या 48 तासांमध्ये महाबळेश्वर, नांदेड, अहनदनगर, नाशिक, परभणी, छत्रपती संभाजीनगर इथं तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड हवामान पाहायला मिळत आहे. मात्र, पुढील काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून
पावसाची कुठलीही शक्यता नाही असं हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हंटले आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे तर मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर
किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. कोकण विभागातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड हवामान पाहायला मिळेल.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडा हवामान पाहायला मिळणार आहे. पुण्यातील
कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं असेल. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही साधारणपणे असंच हवामान पाहायला मिळेल.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश असणार आहे तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे.
मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये घट नोंदवली जाणार असून यामुळे थंडीमध्ये काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकतं तर नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून
किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं नोंदवल गेलं आहे. पुढील 24 तासांमध्ये देखील नाशिकमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.