राजेश विटेकर यांचे विधानपरिषदेवर जाण्याचे स्वप्न भंगणार ?
Rajesh Vitekar's dream of going to the Legislative Council will be broken?
लोकसभा निवडणुकीत परभणी विधान परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी येथे आले होते.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते . विटेकर याना अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनामुळे कार्यकर्त्यात आनंदोत्सव साजरा झाला होता,
परंतु आता अजित पवारांची ही घोषणा अवघड प्रत्यक्षात उतरणे अवघड दिसत आहे. ?लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाल्यामुळे त्याचे राज्यभरात चिंतन सुरू झाले असून
चिंतनामध्ये सर्वात जास्त फटका हा अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे झाल्याचे भाजप आणि शिंदे गट खुलेपणे सांगत आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात सुद्धा अजित पवारामुळे महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपनं अजित पवारांपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्ननायझरनं लोकसभेतील पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं.
भाजप-राष्ट्रवादी युतीची काय गरज होती, असा सवाल ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आला. अजित पवारांमुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याची टीका करण्यात आली. विशेष म्हणजे भाजपच्या एकाही बड्या नेत्यानं याचा प्रतिवाद केला नाही.
त्यामुळे महायुतीत अजित पवार या एकाकी पडले असून भाजपसाठी अजित पवार आता डोईजड झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आता होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकी मध्ये काय होईल हे सांगता येणे शक्य दिसत नाही .
विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलैला निवृत्त होत आहेत. यातील ४ भाजपचे, २ काँग्रेसचे आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शेकाप आणि रासपचा प्रत्येकी एक आमदार आहे.
लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत सुंदोपसुंदी सुरु आहे. भाजप आणि शिंदेसेनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात नाराजी आहे.
राष्ट्रवादीला ४ पैकी केवळ १ जागा जिंकता आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम केलं नसल्याचा शिंदेसेना आणि भाजपमधील नेत्यांचा दावा आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी एकसंघ असताना राजेश विटेकर यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला, यावेळी सुद्धा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात येईल असे असताना
ऐनवेळी महादेव जानकर या पॅराशुट उमेदवाराला परभणीत उतरण्यात आले. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये म्हणून अजित पवार यांनी परभणी येथे पत्रकार परिषद घेत
राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले होते .आता विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळवता आल्या.
यानंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानसभेत सध्या २७४ आमदार आहेत. आमदारांचं निलंबन, काही आमदार लोकसभेवर गेल्यानं १४ जागा रिक्त आहेत.
आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत लवकरच त्याबाबत उमेदवारी जाहीर होईल त्यात राजेश विटेकर यांना उंडवरी देण्यात येईल अशी अशा व्यक्त होत आहे.
होईल परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवारांना किती जागा मिळतील तसेच मिळाले तरी किती जागा निवडून येतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे .
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी विधिमंडळात त्यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
भाजप, शिंदेसेनेतला एकही नेता त्यावेळी हजर नव्हता. त्यामुळे भाजपसह शिंदेसेनेनं दादांपासून अंतर राखण्यास सुरु केल्याची चर्चा आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचे आमदार काय करतात याकडे लक्ष लागलं आहे.
२०२२ मध्ये राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी, बेबनाव लक्षात घेऊन राज्यसभा,
विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्के दिले. त्यांनी संख्याबळ नसतानाही दोन्ही निवडणुकीत भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आणले.
त्यानंतर पुढच्या काहीच दिवसांत एकनाथ शिंदेंचं बंड झालं. पुढे राज्यात सत्तांघर घडलं. या सगळ्यासाठी फडणवीसांनी राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीचा वापर खुबीनं केला होता.
लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. पावसाळी अधिवेशाननंतर दादा गटाचे १८-१९ आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा
आमदार रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार क्रॉस व्होटिंग करु शकतात. तसं झाल्यास अजित पवारांवर नामुष्की ओढावू शकते.
कारण की लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना अजित पवारांच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा झालेला दारून पराभव यामुळे आता अजित पवार सोबत गेलेल्या आमदारांना
दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चिंता लागलेली आहे . बहुतांश आमदार शरद पवाराकडे माघारी फिरण्याची फिरणार असल्याच्या बातम्या येत आहे .
तर लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची शक्ती न दिसल्याने अजित पवारांची महायुतीत बार्गेनिग पावर कमी झाली आहे. तर दुसरीकडे कारण आमदारांमध्ये अस्वस्थता आहे .
अशा परिस्थितीत त्यांच्या वाट्याला किती जागा येतील आणि आल्या मिळालेल्या जागेवर अजित पवार विटेकर यान दिलेल्या आपल्या आश्वासनाची पूर्तता करतील याबाबत सांशकता आहे.
कारण जाणकर यांचा परभणी लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळे विटेकर यांच्या उमेदवारीबद्दल अजित पवार विचार करतील काय?
जर विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली पण निवडणुकीत गुप्त मतदान असते या गुप्त मतदानामध्ये किती आमदार हे मतदान करतील याची शास्वती नाही.
त्यामुळे एखाद्यावेळी विधान परिषदेची राजेश सुट्टेकर यांना उमेदवारी मिळाली तरी मतदानात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत राजेश विटेकर यांचे नशिबात आमदार किंवा खासदार आमदार होणे आहे की नाही हे काळच ठरवेल