मुंबईत जोडे मारो आंदोलन,उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Add Maro movement in Mumbai, Uddhav Thackeray's warning to the rulers

 

 

 

सिंधुदुर्गातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर महाविकास आघाडीने आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं.

 

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती देखील या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पुतळा कोसळण्याच्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला.

 

शिवरायांचा पुतळा कोसळणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान राखला गेला पाहिजे. ज्याने तो पुतळा बसवला त्याची चौकशी झाली पाहिजे, असं शाहू महाराज म्हणालेत.

 

मालवणमध्ये काय झालं, हे आपण पाहिलं. भारताच्या बाहेरही लोक संतप्त झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडणार नाही.

 

महाराष्ट्रात हा संताप झाला आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राचा मान ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान आपण राखला पाहिजे.

 

हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हा पुतळा ज्याने बसवला, त्यांचा निषेध केला पाहिजे, असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

 

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं गेलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा झाला.

 

शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले.

 

गेट वे ऑफ इंडिया परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संबोधित केलं. शाहू महाराज छत्रपती यांनीही संबोधित केलं. त्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा निषेध केलाय.

 

 

वाऱ्यामुळे पुतळा पडला. असं सांगितलं जातं. गेटवेवर हा पुतळा आहे. 50 वर्षापासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत.

 

मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमीचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली आहे.

 

 

 

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले.

 

राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चा काढला.

 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑफ इंडिया असा इशारा दिला. हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिली.

 

गेट वे ऑफ इंडिया आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट.

 

चालते व्हा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हीला महाराष्ट्राने ठेवलं नसतं.

 

माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली, असा सवाल करत हे माफीचे केवळ नाट्य असल्याचा दावा केला.

 

 

स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे, दोन शहाणे होते. एक फूल दोन हाफ होते. एक हाफ तर नाचत होता. मोदींनी माफी कशासाठी मागितली.

 

पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली. भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्यासाठी मागितली, असा सवाल त्यांनी विचारला.

 

मोदी तुम्ही आला. निवडणुकीसाठी आला होताच. आम्हाला अभिमान वाटला होता. नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतोय याचा आनंद वाटला.

 

तेव्हा घाईत पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल.

 

माफी तुम्ही कुणाकुणाची मागणार. भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेलं संसद गळतंय म्हणून माफी मागणार, असा चिमटा त्यांनी मोदी यांना काढला.

 

 

महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले.

 

तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही, असा सज्जड दम त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *