थेट मंत्रालयात घुसून महिलेने केली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोड
The woman directly entered the ministry and vandalized the office of Devendra Fadnavis
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे.
मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला.
तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिल्याची माहिती आहे.
मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री
आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली.
त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली.
ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या महिलेचा आता शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर आता पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा, महिला पोलीस तिथे पोहोचले आहेत.
पोलिसांकडून महिलेला घराचा दरवाजा उघडण्याची विनंती केली जात आहे. पण महिला दरवाजा उघडत नाहीय. महिला पोलिसांकडून या महिलेचं समूपदेशन केलं जाण्याची शक्यता आहे.
पण महिला दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीत नाही. महिलेने काल संध्याकाळी मंत्रालयात जावून सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आरडाओरड केली.
महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी फोडली. तसेच तिथल्या कुंड्या देखील फोडल्याची माहिती आहे. यावेळी महिलेने
प्रचंड आरडाओरडही केल्याची माहिती आहे. महिलेचा तोडफोड करतानाचा व्हिडीओ आज समोर आला आहे. यानंतर पोलीस कामाला लागले आहेत.
पोलिसांनी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर महिला नेमकी कुठे राहते? याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली.
पोलिसांनी महिलेचा घरचा पत्ता शोधून काढला आहे. पोलिसांचं पथक संबंधित महिलेच्या इमारतीत पोहोचले आहे. यामध्ये महिला पोलिसांचा देखील मोठा समावेश आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित इमारतीच्या खाली आहे. पोलिसांकडून महिलेला घराचा दरवाजा उघडण्यासाठी आवाहन केलं जात आहे. पण मला दरवाजा उघडायला तयार नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि तिच्या विरोधात इमारतीमध्ये देखील अनेक तक्रारी आहेत. पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांना बोलावलं आहे.
ही महिला कुणाच्या आवाहनाने घराचा दरवाजा उघडते का, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महिला मनोरुग्ण असल्याने गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. महिलेची चौकशी करण्यात येईल. मात्र गुन्हा दाखल होणार नाही. आरोपी जर मनोरुग्ण असेल तर गुन्हा न दाखल करण्याच कायद्यात प्रावधान आहे.
संबंधित घटना ही काल सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. मुंबईत काल संध्याकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी आटोपून घरी जाण्याची लगबग होती.
पण याच वेळी या महिलेने मंत्रालयात धिंगाणा घातला. मंत्रालय हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे. असं असताना अशाप्रकारे एखादी महिला
प्रवेश करुन धिंगाणा कशी घालू शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.