इराणने दिला इस्रायलला संपविण्याचा इशारा ;इराण पुन्हा हल्ला करणार?

Iran warned to end Israel; will Iran attack again?

 

 

इराणची राजधानी तेहरानमध्ये ४ ऑक्टोबर रोजी दुपारी नमाज पठणानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी भाषण केलं. त्यांनी इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये चालू असलेल्या संघर्षावर टीप्पणी केली.

 

इराणच्या या सर्वोच्च नेत्याने पाच वर्षांनंतर नमाज पठणानंतर भाषण केलं. पॅलेस्टाइनचा संघर्ष योग्य असल्याचं खोमेनी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले,

 

“पॅलेस्टाइनला त्यांची स्वतःची जमीन परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे”. यावेळी खोमेनी यांनी सर्व मुस्लीम राष्ट्रांना एकजूट होण्याचं

 

आवाहन केलं. इराणपासून लेबनॉनपर्यंतच्या संपूर्ण मुस्लीम समुदायाला आवाहन केलं की त्यांनी पॅलेस्टाइनसाठी उभं राहावं.

 

अयातुल्लाह खोमेनी म्हणाले, “अफगाणिस्तानपासून येमेनपर्यंत आणि इराणपासून गाझा, लेबनॉनपर्यंत सर्व मुस्लीम देशांना कंबर कसावी लागणार आहे. इराण हेझबोलाबरोबर उभा आहे.

 

इस्रायलला इराणने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायलने आमच्यावर हल्ला केला तर इराणदेखील स्वस्थ बसणार नाही. पॅलेस्टाइन, लेबनॉन व इराणमधील इस्रायलच्या कारवायांमुळे आम्ही दुःखी आहोत, मात्र आम्ही पराभूत झालेलो नाही”.

 

 

खोमेनी म्हणाले, “अरब मुस्लिमांनी देखील यामध्ये उतरावं. सर्व मुस्लिमांनी बंधूभाव बाळगावा. यातच आपल्या समुदायाचं भलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यांचा, आक्रमणांचा आम्ही विरोध करत आहोत,

 

यापुढेही करत राहू. आमच्या सशस्त्र बलांनी इस्रायलविरोधात केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. ती कारवाई उचित व कायदेशीर आहे. गरज पडल्यास आम्ही इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला करू. इस्रायल आमच्यासमोर फार वेळ टिकणार नाही”.

 

 

खोमेनींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१) शत्रूचे मनसुबे अयशस्वी होतील
२) इराणपासून लेबनॉनपर्यंतच्या मुस्लीम समुदायाने एकत्र यावं.

 

३) शत्रूपासून सावध रहावं लागेल
४) अल्लाहने दाखवलेल्या मार्गावरून बाजूला होऊ नका

 

५) सगळे मुस्लीम एकत्र राहिले तर सर्वांचं भलं होईल, अन्यथा शत्रूचं काम सोपं होईल.
६) मुस्लीम बंधूभाव महत्त्वाचा

 

७) पॅलेस्टाइन त्यांच्या हक्काची लढाई लढत आहे.
८) पॅलेस्टाइनची लढाई वैध आहे. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनने जे काही केलं तो युद्धाचाच भाग होता

 

९) इराणी सैन्याने जे काही केलं ते योग्यच होतं.
१०) आम्ही आमची कारवाई चालूच ठेवू, आम्ही मागे हटणार नाही.

 

 

दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनने अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. “दक्षिण कोरिया आणि त्यांचा मित्र अमेरिकेने मिळून प्योंगयांग प्रदेशावर हल्ला केला तर आमचं सैन्य कुठलाही संकोच न करता अण्वस्त्रांचा वापर करेल”,

 

किम जोंग-उन म्हणाला. एकीकडे इस्र्याल-हमास, इस्रायल-लेबनॉनपाठोपाठ इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. रशिया-युक्रेन संघर्ष देखील थांबलेला नाही.

 

अशातच आता उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

 

उत्तर कोरियामधील सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग-उन म्हणाला, “आमच्या शत्रूने डीपीआरकेच्या (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया) सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्यासाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर डीपीआरके कुठलाही संकोच न बाळगता आण्विक हल्ला करेल. आण्विक शस्त्रांसह आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व विध्वंसकारी अस्त्रांचा वापर करू”.

 

 

उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था, कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंगने बुधवारी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्स युनिटला भेट दिली.

 

 

यावेळी तो म्हणाला, दक्षिण कोरियाने आपल्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सैन्य पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यावर तुटून पडेल. त्या युद्धात आम्ही अण्वस्त्रांसह सर्व विध्वंसक शस्त्रास्रांचा वापर करू.

 

यावेळी किम जोंग उनने दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दक्षिण कोरियाच्या अमेरिकेशी दृढ होत असलेल्या संबंधांवरून उत्तर कोरियाच्या हुकूमशाहचा थयथयाट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

किम जोंग-उन म्हणाला, “सोल (दक्षिण कोरियाची राजधानी) व वॉशिंग्टन (अमेरिकेची राजधानी) मिळून पूर्व आशियातील सुरक्षा व शांतता नष्ट करत आहेत”.

 

गेल्या अनेक दशकांपासून उत्तर कोरिया व दक्षिण कोरियामध्ये संघर्ष चालू आहे. अलीकडेच दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये लष्कराच्या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

यावेळी शत्रूचे तळ उद्ध्वस्त करू शकणाऱ्या क्षेपणास्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांनी किम जोंग उनला इशारा दिला की त्यांनी अण्वस्त्रांचा वापर केला तर त्यांची राजवट संपुष्टात येईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *