परभणी येथे शासकीय अल्पसंख्याक महाविद्यालयासाठी प्रस्ताव पाठवणार ;अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे

Will send proposal for Government Minority College at Parbhani; Additional Collector Dr. Pratap Kale

 

 

 

परभणी जिल्ह्यात परभणी अल्पसंख्याक जिल्हा असल्यामुळे परभणी जिल्ह्यात शासकीय अल्पसंख्याक महाविद्यालय ,

 

अल्पसंख्याक विशेषता मुस्लिम विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 

आणि अल्पसंख्यांक समाजाच्या बेरोजगार युवकांना रोजगारासाठी जॉब फेअर आयोजित करण्यासंदर्भात चा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी दिले.

 

आज यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे अध्यक्ष आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे डॉक्टर रफिक शेख यांनी

 

अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित बैठकीत वरील सूचना केल्या होत्या ,त्या सूचनांच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले आहे

आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित बैठकीत जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

 

यानिमित्त शासनाकडे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध सूचना उपस्थितांनी प्रशासनाला केल्या,

 

डॉ. रफिक शेख यांनी बैठकीत बोलतांना अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी वर्षाला एकदा अल्पसंख्याक समाजाच्या बैठक घेण्याऐवजी दर तीन महिन्यांनी बैठक आयोजित करण्यात यावी,

 

तसेच मागच्या बैठकीत काय सूचना आल्या होत्या त्यावर काय अंमलबजावणी करण्यात आली त्याची माहिती देण्यात यावी,बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात यावे

 

आणि त्या इतिवृत्ताची पुढच्या बैठकीत माहिती देण्यात यावी . दरवर्षी फक्त एक दिवस बैठक घेऊन अल्पसंख्याकांचे प्रश्न सुटणार नसून

 

त्याचा पाठपुरावा शासकीय स्तरावर होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रफिक शेख यांनी यावेळी मांडले.

 

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना विशेषता मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, समाज कल्याण विभागात त्याकरिता नोडल ऑफिसर ची नियुक्ती करण्यात यावी.

 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना रोजगारा करता शासनाकडून जॉब फेअरचे आयोजन करण्यात यावे, परभणी हा अल्पसंख्याक बहुल जिल्हा असल्यामुळे

 

शासनाकडून शासकीय अल्पसंख्या महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी आदी सूचना प्रशासनाला केल्या होत्या

 

त्या सूचना शासनाकडे प्रस्तावाच्या माध्यमातून पाठवण्यात येतील असे अप्पर जिल्हाधिकारी काळे यांनी बैठकीत बैठकीत बोलताना सांगितले

आज झालेले या बैठकीला रितेश जैन ,गुलाम मोहम्मद मिठू ,शेख मारुफ , एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान,

 

तहसीन काजी, पवन अंभोरे , निसार पेडगावकर यांनीही यांनीही अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे सूचना सरकारला केल्या

 

शासनाकडून दरवर्षी अल्पसंख्याक दिन च्या निमित्ताने सोपस्कर म्हणून बैठक घेण्यात येते परंतु प्रत्यक्षात त्याचे नंतर काहीच होत नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.

अल्पसंख्यांकांच्या प्रश्नसंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख असणे आवश्यक आहे परंतु कोणीही उपस्थित नाही याबाबतही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली .

 

यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्यात यावा , दर तीन महिन्याला आढावा बैठक घेण्यात यावा बैठक घेण्यात यावी आणि त्या आढावा बैठकीत मागच्या बैठकीत आलेल्या सूचनावर काय अंमलबजावणी झाली याची माहिती देण्यात यावी .

 

अल्पसंख्याक विशेषता मुस्लिम बहुल परिसरात उर्दू बालवाड्यांची स्थापना करण्यात यावी,

 

मुस्लिम वसाहतीमध्ये रस्ते ,नाली ,लाईटची व्यवस्था करण्यात यावी . मुस्लिम समाजाच्या वस्तीमध्ये समाज मंदिराची बांधणी करण्यात यावी ,

 

अल्पसंख्यांक समाजाच्या योजना करिता शासनाकडून किती निधी आला कोणकोणती कामे झाली याची माहिती देण्यात येत नाही ती माहिती देण्यात यावी ,

 

जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याबद्दल . सामाजिक कार्यकर्ते निवृत्त शिक्षक शेख मारुफ यांनी नाराजी व्यक्त केली

 

तसेच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी दरवर्षी निधी दिल्याचे सांगण्यात येते परंतु नेमकं किती निधी आला

 

आणि त्या निधीच्या माध्यमातून कोण कोणती कामे झाली याची माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली .

 

 

या बैठकीत शेख उस्मान नितीन सावंत, मुफ्ती गौसोद्दीन यांनीही आपले विचार मांडले महानगरपालिकैची आपण कॉर्नर येथील वाचनालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून त्याची दुरुस्ती कार्नाय्त यावी ,

 

लायब्ररीमध्ये पुस्तकांची व्यवस्था करण्यात यावी तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली

 

अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन हे अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे.

 

याचा सर्व अल्पसंख्यांक समाजातील वंचित घटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी केले.

डॉ. काळे यांनी अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, अभ्यासिका

 

यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे लोककल्याणकारी काम करावे,

 

असे आवाहन केले. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात सहायक जिल्हा नियोजन अधिकारी बालासाहेब चौलवार यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

 

यावेळी जिल्हा नियोजन कार्यालयातील सहाय्यक संशोधन अधिकारी उमाकांत लोखंडे, धम्मपाल कांबळे,

 

बालासाहेब भिसे, सांख्यिकी सहायक संजय भोसले यांच्यासह शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

यावेळी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे डॉ. काळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *