महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या संचालकपदी रवींद्र पतंगे
Rabindra Patange as Director of Maharashtra State Housing Finance Corporation

महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या (गृहवित्त) संचालकपदी शिवसेनेचे युवा नेते रवींद्र पतंगे – देशमुख हे बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन मुंबईच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली. मराठवाडा विभागातून पाच संचालक निवडुन द्यावयाचे होते.
पाच जागेसाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 13 डिसेंबर शेवटचा दिवस होता. इतर चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रवींद्र देशमुख,
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, नांदेडचे हरीहर भोसीकर, छत्रपती संभाजी नगरचे सुनिल जाधव, बीडचे जयसिंग पंडीत हे बिनविरोध निवडून आले.
बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,जयंत पाटील, प्रविण दरेकर, आ.डॉ.राहुल पाटील, राजेश टोपे, अंकूश काकडे, प्रकाश दरेकर, सुभाष झाम्बड ,व्ही.बी. पाटील यांनी प्रयत्न केले.