शारदा महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी
Birth anniversary of Mahatma Basaveshwara and Rashtrasant Tukadoji Maharaj celebrated at Sharda College

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून साजरी करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बबन पवार तर प्रमुख अतिथी औंढा नागनाथ महाविद्यालयाचे डॉ. सुरेश शेळके, उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे,
गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. पी. देशपांडे विचार मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यानंतर डॉ. गोपाळ पेदापल्ली यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मानसशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवराकडूनत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले की, महात्मा बसवेश्वर हे मध्यकाळातील युगपुरुष होते. अंध: युगाला तोडून स्त्री-पुरुष समानता,
जाति-भेदाची दारे मिटवून नव्या युगाची चाहूल निर्माण करणारे आद्य समाज सुधारक होते. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतातून ग्राम विकासाचा मंत्र देऊन राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींना योगदान दिले.
प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश शेळके म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी शिवानुभव मंडप याची स्थापना करून आधुनिक संसदीय लोकशाहीची उभारणी केली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अविनाश पांचाळ यांनी, प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. पी. देशपांडे तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. संतोष नाकाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जयपूरकर, प्रकाश काळे, तनुजा रासवे यांनी प्रयत्न केले. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्यांकाने उपस्थित होते.