हल्ल्याच्या निषेधार्थ आज `डोंबिवली, अमरावती, मालेगाव, परभणीत कडकडीत बंद
Strict shutdown in Dombivli, Amravati, Malegaon, Parbhani today to protest the attack

दहशतवाद्यांनी केलेल्यास हल्ल्याच्या निषेधार्थ आज `डोंबिवली, अमरावती, मालेगाव, परभणीत कडकडीत बंद
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस हल्ल्यात 26 लोकांनी जीव गमावला असून त्यामध्ये भारतीयांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये डोंबिवलीतील तिघे, पुण्यातील 2 तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे.
यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.दहशतवाद्यांनी केलेल्यास हल्ल्याच्या निषेधार्थ आज `डोंबिवली, अमरावती, मालेगाव, परभणीत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झालं आहे.
अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन डोंबिवलीकतरांचा काश्मीरमध्ये हकनाक बळी गेला असून त्यांच्यावर काल शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व पक्ष, व्यापारी, शाळा, आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत.
काल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघा पर्यटकांवर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. असून आज सकाळ पासून डोंबिवलीतील दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना बंद आहेत.
शहरातील विविध भागांत निषेध बॅनरबाजी लावण्यात आले असून नागरिक, व्यापारी, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत
या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी डोंबिवली बंद पुकारला असताना आता या बंदमध्ये शाळेने देखील सहभाग घेतला आहे.
डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अस्थापना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच पार्स्वभूमीवर आज शाळेची असलेली परीक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आली आहे.
ही परीक्षा शनिवार दिनांक 26/4/2025 रोजी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेनुसार होतील. याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे आव्हान शाळेत प्रशासनाकडून केले जातात
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावतीशहर बंद व निषेध आंदोलन करण्यात येईल. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्वच हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांच उद्या सकाळी दहा वाजता आंदोलन होईल. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी निषेधाचं आंदोलन केलं जात आहे. उद्या अमरावतीतही निषेध आंदोलनाच आयोजन करण्यात आलं आहे.
पहेलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलने देखील होणार आहेत.
काश्मीरच्या पहेलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचं छत्रपती संघटना कडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.