स.पोलीस उपनिरीक्षक इरशाद अहमद रऊफ खान यांना पोलीस दलाचे सन्मानचिन्ह जाहीर

Police Sub-Inspector Irshad Ahmed Rauf Khan awarded Police Force Medal

 

 

 

पोलीस विभागामध्ये आपले कर्तव्य बजावत असतांना विविध प्रकारच्या केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल, त्यांच्या उत्तम सेवेबद्दल राष्ट्रपती यांच्याकडून पोलीस दलातील अधिकारी ,कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक आणि शौर्य पदक जाहीर करण्यात येत असते.

 

2024 वर्षाकरिता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील एक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक आणि पोलिस हवालदार यांचा समावेश आहे .

 

पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या यादी मध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक इरशाद अहमद रऊफ खान आणि पोलीस हवालदार संजय सखाराम घुगे यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या स्वाक्षरीने सोमवारी यादी जाहीर करण्यात आली आहे, शुक्ला यांनी जाहीर केलेले यादीमध्ये 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

 

तर परभणी जिल्ह्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक इरशाद अहमद रऊफ खान आणि पोलीस हवालदार संजय सखाराम घुगे या दोघांचा समावेश करण्यात आलेला आहे,

 

मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे पोलीस दलातील अधिकारी,कर्मचारी तसेच मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *