VIDEO;आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्हायरल व्हिडिओवर दिले स्पष्टीकरण

MLA Meghna Bordikar explained on the viral video

 

 

 

 

विधानपरिषद निवडणुकांसाठी आज विधिमंडळ सभागृहात मतदान होत असून राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि कोणाची मतं फुटणार, यावरुन चांगलीच चर्चा होत आहे.

 

 

 

विशेष म्हणजे एकीकडे मतदानाचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा सभागृहातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.

 

 

विधानसभा सभागृहात आमदार आपलं म्हणणं मांडत असताना, संबंधित आमदाराच्या पाठिमागे बाकावर बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर

 

 

आपल्या पर्समधून काही पैसे काढून फाईलमध्ये ठेवत असल्याचं दिसून येत आहे. आता, या व्हायरल व्हिडिओसंदर्भात आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्याजवळील फोल्डरमध्ये काही नोटा ठेवल्याचं दिसून येत आहे. मात्र, हा व्हिडिओ चुकीच्या आणि खोडसाळपद्धतीने व्हायरल केला जात आहे.

 

 

विनाकारण विधानपरिषदेतील मतदानाशी या व्हिडिओचा संदर्भ जोडला जात असल्याने व्हायरल व्हिडिओवर आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले.

 

 

मात्र, नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत.

 

 

हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे,

 

 

 

असे स्पष्टीकरण आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे. त्यामुळे, संबंधित व्हिडिओ खोट्या पद्धतीने व्हायरल करणाऱ्यांनाही मेघना बोर्डीकर यांनी चांगलंच सुनावलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *