षडयंत्राला बळी न पडता AIMIM ला मतदान करा ;ऍड इम्तियाज खान

Vote AIMIM without falling prey to conspiracy ;ad Imtiaz Khan

 

 

 

विधानसभा निवडणूक 2024 करिता प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून कुल हिंद मजलीस ए इतेहादूल मुस्लिमिन चे अधिकृत उमेदवार ऍड इम्तियाज खान यांचाही प्रचार जोमाने सुरू आहे.

 

काल झालेल्या सुभेदार नगर, पारवा गेट येथील सभेत एड इम्तियाज खान यांनी आपला खास शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला, खान म्हणाले की आरएसएस वाल्यांची भीती दाखवून आर एस एस वाल्यांनाच मतदान करा

 

असे म्हणणाऱ्यांचे षडयंत्र मतदारांनी समजले पाहिजे ,विशेष करून मुस्लिम समाजांने आपले प्रश्न काय आहेत. त्याची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्याना मतदान न करता

 

परभणीच्या विकासाचा रोडम्याप घेऊन चालणाऱ्या एमआयएम च्या पतंग या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन ऍड खान यांनी यावेळी मतदारांना केले.

 

माझ्या समाजाचा आरोग्याचा काय? माझ्या समाजाचा विकासाच्या काय ?माझ्या समाजाचा आरक्षणाचा काय? हे प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन फक्त एमआयएम हा एकाच पक्ष देऊ शकतो

 

काही लोक भोळ्या भाबळ्या जनतेला विकण्याचे काम करीत आहेत त्यांच्या या भुलथान बाली न पडता निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही.

 

जनतेलाही मी सांगू इच्छितो की तुमच्याविरुद्ध सुरू असलेल्या हा कारस्थान मोडून काढा व येणाऱ्या 20 तारखेला पतंगाचां समोर चार नंबरचा बटन दाबून विजयी करा व विकासाचे नवे पर्व सुरू करा.

 

याद राखा आपले मत वाया जाऊ देऊ नका या जातीवादी शक्तींना धडा शिकवा त्यांना घरी बसवा ज्यांनी आपल्या विकासाची प्रत्येक संधी हिसकावून घेतली आहे

 

तुम्ही त्यांची हे संधी हिसकावून घ्या असे आवाहन ऍड इम्तियाज खान यांनी जाहीर सभेत केले या सभेत हजारो ची संख्यात लोक उपस्थित होते

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *