मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया

Surgery on Chief Minister Eknath Shinde ​

 

 

 

 

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

 

 

त्यांच्या डोळ्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांनी डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

 

 

शुक्रवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांचा नातू रुद्रांश यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. ठाण्यातील निवासस्थानी त्यासाठी कार्यक्रम झाला.

 

 

 

त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली. ठाणे येथील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

 

 

 

 

ला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

 

 

 

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चार फेब्रवारी रोजी आहे. त्यानिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

 

आमची निष्ठा….. कालपण इथेच होती, आजपण इथेच आहे, उद्यापण इथेच राहणार….महाराष्ट्राचे भाग्यविधाते असा उल्लेख असलेले बॅनर शहरात झळकत आहे. बॅनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन खासदार शिंदे यांच्याकडून केले जात आहे.

 

 

 

1 फेब्रुवारी रोजी रुद्रांश याचा 4 फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदे तर 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. एकाच महिन्यात तिघांचे वाढदिवस येत आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *