उच्चशिक्षित मोबाईल चोर शक्कल लढवून विकायचा मोबाईल
A highly educated mobile thief used to sell mobile phones by fighting
काळ बदलला तशी नवीन नवीन टेक्नोलॉजी देखील येत गेली. मात्र कधी कधी या टेक्नोलॉजीचा फटकादेखील बसतो. डिजीटल पेमेंटही एक क्रांती समजली जाते.
मात्र, काही जण त्याचाही फायदा घेत चोरी करतात. सायबर क्राइमचे प्रकार अलीकडेच वाढले आहेत. उच्चशिक्षित लोकही सायबर क्राइमच्या माध्यमातून गुन्हा करताना दिसत आहेत.
असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. मोबाईल चोरी करून बनावट बिलाच्या आधारे त्याची विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी अटक केलेला हा चोरटा बीएससी केली असून तो पदवीघर आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे तब्बल 17 मोबाइल जप्त केले आहेत,
अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. ओंकार विनोद बत्तुल (वय २२, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिवाजीनगर येथील जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून आरोपीने मोबाईल चोरी केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी सापळा रचत आरोपीला शिवाजीनगर भागातून अटक केली आहे. चौकशीनंतर त्याच्या ताब्यातून १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी चोरलेल्या मोबाइलच्या बिलामध्ये फेरफार करून तो स्वत:चा मोबाईल असल्याचे भासवून विक्री करीत होता. बनावट बिलाच्या आधारे मोबाईल विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पुण्याबरोबरच नाशिकमध्येही मोबाइल चोरांनी हौदोस घातला आहे. मालेगावर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या 4 तासांत मोबाइल चोरांना अटक केली आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये धूम स्टाईल दुचाकीवरून येऊन ही टोळी मोबाईल हिसकावून घेऊन पोबारा करत होती. या टोळीत तब्बल पाच जण सहभागी होते.
पोलिसांना तक्रार मिळाल्यापासून अवघ्या ४ तासात या टोळीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी
तीन दुचाकींसह चोरीचे १६ मोबाइल ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.