प्राध्यापक सुरेश कदम महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर

Professor Suresh Kadam on Maharashtra State Marathi Encyclopaedia Production Board

 

पूर्णा/ शेख तौफिक/9970443024

 

 

शासनाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पूर्नरचना नुकतीच केली असून मंडळावर नवीन अध्यक्षासह 25 सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या मंडळावर पूर्णा येथील मराठी भाषा विषयाचे प्रा. सुरेश कदम यांची वर्णी लागली आहे.

 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कार्यकाल 26 मे 2024 रोजी संपुष्टात आला आहे त्यामुळे शासनाने या मंडळाची पूर्ण रचना करावी असे सुचित केले होते

 

त्यानुसार राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या कार्यकारी अधिकारी वैशाली वाघमारे यांनी मंडळाची पुनर्रचना करत विविध क्षेत्राशी निगडित असलेल्या 25 सदस्यांची या मंडळावर निवड केली आहे.

 

त्यांनी दि.15 ऑक्टोबर रोजी याबाबत एक परिपत्रकही जाहीर केले आहे.विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्षांसह सदस्य हे 27 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार पुढील तीन वर्ष कालावधीसाठी किंवा

 

शासनाचे पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत हे सदस्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. पूर्ण शहराचे रहिवासी असलेले परभणी येथिल  राजश्री शाहू महाविद्यालयात

 

मराठी भाषा विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ.सुरेश व्यंकटराव कदम यांची या मंडळावर निवड करण्यात आली आहे.

 

त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य मोहनराव मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, पालीकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे, श्री.गुरु बुद्धी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजू अण्णा एकलारे

 

नगरसेवक शाम कदम प्रा. गोविंदराव कदम,गजानन हिवरे,शंकर गलांडे , अँड रोहीदास जोगदंड आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *