भाजप नेत्यानेच सांगितले अशोक चव्हाणांचे भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले

The BJP leader himself said that Ashok Chavan has suffered a great loss by joining the BJP

 

 

 

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात आले भाजपला समाधान झाले असेल, पण अशोक चव्हाण यांचे मात्र भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

एक राज्यसभा ही अशोक चव्हाण यांची लायकी नाही, अशोक चव्हाण यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांचं भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली आहे.

 

 

 

नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने सध्या जिल्ह्यामध्ये हा पराभव खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे झाला अशी चर्चा सुरू आहे.

 

 

 

या विषयावर माजी केंद्रीय मंत्री भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी

 

 

 

भाजपात आल्यामुळे त्यांचे मोठे राजकीय नुकसान झाल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या. कुठल्याही पराभवाचे कारण एका नेत्यावर देऊन चालणार नाही.

 

 

 

अशोक चव्हाण यांच्या मुळे भाजपाचा नांदेड जिल्ह्यत पराभव झाला अस कोणीही म्हणू शकत नाही, असं म्हणत सुर्यकांता पाटील यांनी अशोक चव्हाणांची पाठराखण केली आहे.

 

 

अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले होते.

 

 

 

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मुख्यमंत्रिपद देऊनही अशोक चव्हाणांनी ऐन निवडणुकीत बदलेला पक्ष या सर्व बाबींमुळे नांदेड मतदारसंघात नाराजी पसरल्याचे बोलले गेले.

 

 

 

त्यामुळे प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र असूनही नांदेडमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या विजयासाठी भाजपच्या दिग्गजांनी सभा घेतल्या.

 

 

 

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बड्या नेत्यांनी चव्हाण यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. पण मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे

 

 

 

 

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदमवारीमुळे मतांची गणितं बदलतील असे बोलले जात होते. मात्र, या जागेवर आता वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. ते 59 हजार 442 मतांच्या फरकाने विजयी झाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *