CBI-सुप्रीम कोर्टाची नोटीस,महिला अधिकाऱ्याला 10 दिवस केले डिजीटल अरेस्ट

CBI-Supreme Court notice, digital arrest of female officer for 10 days

 

 

 

इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकाऱ्याला 25 लाख रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे.

 

या महिलेला तब्बल 10 दिवस डिजीटल अरेस्ट करण्यात आलं होतं. व्हिडिओ कॉल करून मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी

 

या महिला अधिकाऱ्याला करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रवीण कुमार, केसी सुब्रमण्यम, प्रदीप सावंत आणि संदीप राव अशी नाव सांगून सायबर ठगांनी जळगावातील एक महिला अधिकाऱ्याला वारंवार व्हॉट्सऍपवरून व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल तसंच नॉर्मल कॉल

 

आणि मेसेज केले. तुमच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं सांगून त्यांना सुप्रीम कोर्ट, सीबीआय आणि इंटरपोलची बनावट नोटीसही पाठवण्यात आली.

 

बनावट कागदपत्र पाठवून या महिलेला अटकेची भीती दाखवण्यात आली. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या सगळ्या केसमधून बाहेर पडण्यासाठी महिलेकडे इन्सपेक्शन फीच्या नावाखाली 25 लाख रुपये एका बँकेच्या खात्यात टाकायला सांगण्यात आलं.

 

 

तब्बल 10 दिवस या महिलेला डिजीटल अरेस्ट करण्यात आलं होतं. अखेर घाबरलेल्या महिलेने यवतमाळमध्ये जाऊन पैशांची व्यवस्था केली आणि सायबर ठगांनी सांगितलेल्या खात्यावर पैसे जमा केले.

 

शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर 52 वर्षांच्या महिलेने याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात प्रवीण कुमार, केसी सुब्रमण्यम, प्रदीप सावंत आणि

 

संदीप राव अशी नावं सांगणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून जळगाव सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *