बाबळगाव फाटा ते लोणीगुंज खड्डेमय रस्ता ठरतोय अपघाताला निमंत्रण
The potholed road from Babalgaon Phata to Lonigunj is becoming an invitation to accidents.
पाथरी /विठ्ठल प्रधान
पाथरी तालुक्यातील बाबळगाव फाटा ते लोणीगुंज या रस्त्याची गेल्या दोन वर्षापासून बिकट अवस्था झाली असून या रस्त्याकडे सा.बा विभागाच्या अधिकारी यांनी लक्ष देऊन त्वरित राहिलेल्या रोडचे काम चालू करावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
माहिती अशी की गेल्या दोन वर्षापासून ह्या रोडचे काम घेतलेले असून या गुत्तेदाराने अर्धवट काम करून सोडून दिले आहे . राहिलेले काम गेल्या वर्षीपासून तसेच रखडले आहे.
या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याने वाहनधारकांना मोठ्या परेशनीचा सामना करावा लागत आहे, खराब रस्त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.
लोणी गावांमधून हा रास्ता जात असल्याने या गावा जवळील शाळा व अंगणवाडी मध्ये विद्यार्थी येत असतात , दिवसातून जवळपास पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून होत असते.
परंतु रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेल्या खड्यामुळे वान कधी पलटी होऊ शकेल हे काही सांगता येत नाही. छोटे मोठे अपघात तर दररोज घडत असतात परंतु एखादा मोठा अपघात घडल्यास जीवित हाणी होण्याचा धोका आहे .
रस्त्याचे काम गुतेदाराने अर्धवट सोडल्याने हा रास्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. हा अर्धवट रस्ता संभांडीत गुत्तेदार कधी पूर्ण करेल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
बाबळगाव फाटा ते लोणी काळसूर गुंज उंबरा अंधापुरी या ठिकाणाहून कारखान्यासाठी जाणारे वाहने ट्रॅक्टर असो किंवा ट्रक हे वाहने दररोज या रस्त्याने जात असल्याने हे वाहने कधी पलटी होऊ शकतात हे सांगता येऊ शकत नाही
म्हणून गावकऱ्यांच्या वतीने जर या रस्त्याचे गुत्तेदार यांनी लवकरात लवकर काम चालू न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत ,
सा बा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन व गुत्तेदार यांना चौकशी करून उर्वरित राहिलेल्या रोडच्या डांबरीकरण कामाचे सुरुवात करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.