परभणी लोकसभा; पहिल्या फेरीत बंडू जाधव 8 हजार मतांनी आघाडीवर
Parbhani Lok Sabha; Bandu Jadhav leading by 3000 votes in the first round

परभणी लोकसभा; दुसऱ्या फेरीत बंडू जाधव दुसऱ्या फेरी अखेर 8 हजार 929 मतांनी आघाडीवर
परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे पोस्टल मतांच्या मतमोजणीत 3 हजारांवर मतांनी आघाडीवर राहिले आहेत,
पहिल्या फेरीत पडलेली एकूण मते
संजय जाधव – २०,७८६
महादेव जानकर – १७,५२२
पंजाबराव डख – ४३७५
समीर दुधगावकर – ६६४
आलमगीर खान – ४७८
राजन क्षीरसागर – २७१
किशोर ढगे – १७७
नोटा – १२३
एकूण वैध मते -49,879
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय हरिभाऊ जाधव आघाडीवर
परभणी लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीस 4 जून रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी सुरुवात झाली.
यावेळी जिंतूर, परभणी आणि गंगाखेड मतदार संघासाठी कृष्णकुमार निराला तर पाथरी, परतूर आणि घनसावंगी मतदारसंघासाठी एन. मोईनोद्दीन हे निवडणूक निरिक्षक म्हणुन हजर होते.
जिल्हा निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूमचे रितसर दरवाजे उघडण्यात आले,
त्या पाठोपाठ ईव्हीएम मशीन मतदारसंघनिहाय त्या त्या कक्षात संबंधित टेबलवर उपलब्ध करण्यात आल्या. त्यानंतरच साडेआठच्या सुमारास मतमोजणी सुद्धा प्रारंभ झाला.
तत्पूर्वी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पोस्टल मतांची गणना करण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे जाधव हे आघाडीवर राहिले. आयोगाने जाधव व त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांच्यासह अन्य उमेदवारांना पडलेल्या पोस्टल मतांबद्दल सकाळी पावणे दहा पर्यंत माहिती दिली नाही.
दरम्यान, मतदार संघाच्या आज होणार्या मतमोजणी मध्ये 95-जिंतूर फेर्या, 98- पाथरी मतदारसंघात 29 फेर्या, 99-परतूर मतदार संघात 25 फेर्या आणि 100-घनसावंगी मतदार संघात 26 फेर्या होणार आहेत. या सर्व सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत.
तसेच पोस्टल मतमोजणीकरीता 14 टेबल तर ईटीपीबीएस मतमोजणीकरीता 6 टेबल असणार आहेत. मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी 14 टेबलांकरीता प्रत्येकी 3 असे एकुण 42 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
तर पोस्टल मतमोजणीकरीता टेबलनिहाय 4 आणि ईटीपीबीएस मतमोजणीकरीता प्रत्येकी 3 असे अधिकारी-कर्मचारी यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
सरमिसळ प्रक्रियेद्वारे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व सुक्ष्म निरीक्षक यांना सोमवारी निवडणूक निरिक्षक कृष्णकुमार निराला
आणि एन. मोईनोद्दीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी मतमोजणी प्रकिये संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले होते.
परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सुरुवात ही प्रथम टपाली मतपत्रिका (पोस्टल) मोजणीद्वारे करण्यात आली. यामध्ये मतदान कर्मचारी व सर्व्हिस व्होटर्सच्या मतदानाचा समावेश आहे.
तसेच एकूण ईव्हीएमप्रमाणे मतमोजणीच्या सर्व फेर्या पूर्ण झाल्यानंतर ड्रॉ पध्दतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटची निवड करून त्यामधील मतदान चिठ्ठयांची मोजणी करण्यात येणार आहे.
तसेच ईव्हीएमच्या मतांशी त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. निवडणूकीचा निकाल संध्याकाळी सुमारे 5 वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता असल्याचे सांगत ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत पार पाडली.
त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया देखील शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.