विधान परिषद निवडणुकीत नांदेडचे आमदार फुटले , वडेट्टीवारांनी सांगितले सर्व नावे

Nanded MLAs split in Vidhan Sabha elections, Vadettivar said all the names

 

 

 

विधानपरिषद निवडणुकीत पक्षातील काही आमदारांवर आम्हाला शंका होती. या गद्दार आमदारांना शोधण्यासाठी आम्ही तिसरी जागा लढवली.

 

आता या आमदारांची नावे पुढे आली असून त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घेतला असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

रविवारी नागपुरात प्रसारमाध्यांशी बोलताना वडेट्टीटवार म्हणाले, संख्याबळ पाहता विधानपरिषद निवडणुकीत तिसऱ्या जागेसाठी चुरस होती.

 

छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही चर्चा करून निवडणुकीला सामोरे गेलो. पण, आम्हाला आमच्या आणि महाविकास आघाडीतील काही लोकांवर शंका असल्यामुळे आम्ही तिसरी जागा लढवली.

 

आमचे काही आमदार पक्षाच्या चिन्हावर येऊन गडबड करत असल्याचे लक्षात आले होते. गेल्या वेळी सुद्धा असाच विश्वासघात झाला होता.

 

यावेळी एका विशिष्ट पद्धतीने यात काही लोक शोधण्यात आम्हाला यश आले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

पक्षाच्या विरोधात गेलेल्यांबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धीकीचे वडील बाबा सिद्दीकी यापूर्वी अगोदरच पक्ष सोडून गेले आहे.

 

 

नांदेडचे दोन आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत होते. व्हीप टाकून सुद्धा मतदानामध्ये यांनी गद्दारी केली. आमदार सुलभा खोडके यांनीही पक्षविरोधी मतदान केले.

 

 

पक्षाशी गद्दारी करणारे सापडले आहे. त्यामुळे हायकमांड आता त्यांच्यावर कारवाई करते हे लवरच कळेल असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

 

यावेळी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सत्ताधिकाऱ्यांनी सुरु केला. त्यामुळे शरद पवार यांनी हा वाद सुरू केल्याचे छगन भुजबळ यांनी केलेले विधान चुकीचे आहे.

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुपचूप ओबीसी समाजाच्या बैठका घेतल्या आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाला गुलाल उधळायला लावून दिशाभूल करतात.

 

 

त्यातून सत्ताधारी आपली पोळी शेकण्याचे काम करत असताना त्यांचे पितळ उघड पडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *