अजितदादा म्हणाले मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन,काय म्हणाले रोहित पवार

Ajitdada said I will win in Baramati by more than 1 lakh votes, what did Rohit Pawar say

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

 

तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार?

 

याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये 1 लाखाहून अधिक मतांनी जिंकणार, असा ठाम विश्वास वक्तव्य केलाय.

 

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले.

 

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीत सामना रंगला. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे.

 

या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला

 

आणि मी तो स्वीकारला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेळी मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.

 

विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

आता, अजित पवारांच्या या विश्वासावर आता त्यांचे प्रतिस्पर्धी युगेंद्र पवार आणि पुतण्या रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही सगळेच राजकारणात राहणार आहोत, पण 23 तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल,

 

असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, आमच्या 167 ते 180 च्या आसपास जागा येतील, परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी सभा घेतल्या तर आणखी 20 आमदार वाढतील,

 

असा टोला रोहित पवारांनी भाजपच्या बड्या नेत्यांना लगावला. त्यांच्या तोंडातून महाराष्ट्राबाबत सकारात्मक शब्द जात नाही, हे लोकांना आवडत नाही.

 

जिथे भाषण करता तिथे द्वेष पसरवतात, ही संतांची भूमी आहे, येथील लोकांना आवडत नाही. यंदाच्या निवडणुकीत आम्ही टार्गेट 288 ठेवले, त्यांनी टार्गेट 175 ठेवले त्यामुळे 120 च्या आसपास ते कसं तरी पोहोचतील.

 

23 तारखेला गुलाल हा विकासाकडेच असेल बारामतीत महाविकास आघाडीच निवडून येईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तर, युगेंद्र पवार यांनीही 23 तारखेला पाहू, असे म्हटले आहे.

 

बारामती तालुक्यात चांगला उत्साह आहे, आज रोहित दादांसोबत प्रचार करत आहोत. विकास ही एक व्यक्ती कुठली करत नसते, तो विकासात सर्वांगीण असतो. त्याच्यामध्ये दादांचं, साहेबांचं, ताईंचं रोहित दादांचं या सगळ्यांचे योगदान आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलं.

 

तसेच, पवार साहेबांसोबत सर्वसामान्य जनता आहे, त्यामुळे विजयाचा विश्वास वाटतो. लोकसभेचे वातावरण टिकून आहे. अजित दादांनी एक लाखांच्या मताधिक्याचं वक्तव्य केलं आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, 23 तारखेला कळेल, असा पलटवार युगेद्र पवार यांनी अजित पवारांच्या विधानावर केलाय.

 

युगेंद्र माझ्यापेक्षा जास्त शिकला आहे. आमची तालीम एकच आहे, वस्ताद एकच आहे. युगेंद्रला बारामतीमधील अडचणी माहीत आहेत, आता त्या सोडवण्याची वेळ आली आहे.

 

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल एकही भाजप नेता बोलला नाही. अमित शहा यांना एकानेही विचारलं नाही. योगी आले होते. त्यांच्या सभा खूप मोठ्या असतात. खुर्च्या जास्त लावायच्या आणि कमी माणसे येतात.

 

अमित शाह यांनी लोकसभेमध्ये साहेबांना विचारलं होतं, दहा वर्षात तुम्ही काय केलं? लोकसभेला दाखवले की साहेबांनी काय केलं. कोल्हापूरला म्हणाले पुरावे द्या,

 

23 तारखेला पुरावा भेटेल. राज्यात आपले सरकार येईल, 170 पेक्षा जास्त आमदार आपले निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *